Saina Nehwal On Siddharth’s Tweet : प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालने (Saina Nehwal) अखेर सिद्धार्थच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे. पंजाबमध्ये नुकत्याच घडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत सायना नेहवालने एक ट्वीट केले होते. सायनाच्या ट्वीटवर भाष्य करत सिद्धार्थने त्याचे मत मांडले. सिद्धार्थने या ट्वीटमध्ये आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे त्याचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

Continues below advertisement

सायना नेहवालने सिद्धार्थच्या ट्वीटला उत्तर देत नाराजी व्यक्त केली आहे. सायना म्हणाली, "मला माहीत नाही त्याला काय म्हणायचयं. मला तो अभिनेता म्हणून आवडायचा पण हे त्याने योग्य केलेलं नाही. तो अधिक चांगल्या शब्दांत व्यक्त करू शकला असता. पण हे ट्विटर आहे. ट्विटरवर आक्षेपार्ह शब्दांची दखल घेतली जाते". सायनाचे पती पारुपल्ली कश्यप यांनीदेखील सिद्धार्थच्या आक्षेपार्ह ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे. पारुपल्ली ट्वीट करत म्हणाले,"तुमची मतं व्यक्त करा..पण चांगल्या शब्दांत".

Continues below advertisement

काय आहे प्रकरण पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाभंग प्रकरणाबद्दल सायना नेहवालने ट्वीट केले होते.   सायनाच्या ट्वीटवर भाष्य करत सिद्धार्थने त्याचे मत मांडले. सिद्धार्थने या ट्वीटमध्ये आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे सध्या त्याला अनेक जण ट्रोल करत आहेत. सिद्धार्थने त्याच्या ट्वीटमध्ये 'शेम ऑन यू रिहाना' असंही लिहिले होते. सिद्धार्थने ट्वीटमध्ये वापरलेल्या शब्दाचा निषेध करत महिला आयोगाने त्याला नोटीस पाठवली आहे.

संबंधित बातम्या

Actor Siddharth Tweet: सायना नेहवालबद्दल ट्वीट करणं सिद्धार्थला भोवलं; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Sushant Singh Rajput case : रिया चक्रवर्तीनंतर आणखी दोन आरोपींची खाती गोठवली, न्यायालयाने एनसीबीला फटकारले

Pushpa on OTT : अल्लू अर्जुनच्या पुष्पाचा 'या' दिवशी हिंदींत होणार प्रीमिअर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha