Pushpa on OTT : अल्लू अर्जुनच्या पुष्पाचा 'या' दिवशी हिंदींत होणार प्रीमिअर

Pushpa on Amazon Prime Video : 'पुष्पा: द राइज' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Continues below advertisement

Pushpa on Amazon Prime Video :  दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तरीदेखील सिनेमा कोट्यवधींची कमाई करतो आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'पुष्पा' सिनेमा आता प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील पाहता येणार आहे. लवकरच पुष्पाचा हिंदीत प्रीमिअर होणार आहे. 

Continues below advertisement

पुष्पा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर हिंदी भाषेत प्रेक्षकांना 14 जानेवारी पासून पाहता येणार आहे. तर  7 जानेवारी रोजी हा सिनेमा तेलुग, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. 'पुष्पा: द राइज' हा पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन  देवी श्री प्रसाद यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.

अल्लू अर्जुनचा पुष्पा सिनेमा 2021 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आणि आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणार्‍या तेलुगु चित्रपटांपैकी एक आहे. बॉक्सऑफिसवर सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात सिनेमाने 26 कोटींची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात  20 कोटी कमवले. तर तिसऱ्या आठवड्यात 25 कोटींची कमाई करत सिनेमाने तीन आठवड्यात 72 कोटींची कमाई केली.

संबंधित बातम्या

SS Rajamouli Film : एसएस राजामौलींच्या आगामी सिनेमाचा हिरो रणबीर कपूर? Alia Bhatt असू शकते हिरोईन!

Sushant Singh Rajput case : रिया चक्रवर्तीनंतर आणखी दोन आरोपींची खाती गोठवली, न्यायालयाने एनसीबीला फटकारले

Viral video : कतरिना भांडी घासतेय... विकी लोणी-पराठे खातोय....रंगलाय कतरिना-विकीचा संसार; व्हिडीओ होतोय व्हायरल

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola