Sushant Singh Rajput case : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत
(Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणानंतर एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांचे  गॅझेट जप्त करण्यात आले होते. तसेच त्यांची बँक खाती गोठवली होती. आता या प्रकरणातील 2 आरोपींची बँक खाती डी-फ्रीज करण्यात येणार आहेत. 


सुशांतच्या मृत्यूप्रकरणी एनसीबीने जय मधोक आणि जैद विलात्रा यांची बँक खाती गोठवली होती. आता त्यांच्या याचिकेवर विशेष न्यायालयाने या दोघांची खाती डी-फ्रीज करण्याचे आदेश दिले आहेत. तपास अधिकाऱ्याचे असे काम पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने त्यांच्या आदेशात म्हटले आहे. मात्र, एनसीबीने या आवाहनाला विरोध करत या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले होते. याआधी रिया चक्रवर्तीची बँक खातीही गोठवली होती. त्यानंतर रियाने आपले बँक खाते डी-फ्रीझ करण्याचे आवाहन केले.


कोर्टाने सांगितले की, रियाचे अकाऊंट आणि फिक्सड डिपॉजिट  डी- फ्रीज करण्याच्या याचिकेवर NCB चा आक्षेप नाही. कारण रियाकडून लेखी अंडरटेकिंग घेण्यात आले आहे. रीया गरज पडल्यास अकाउंट बॅलेन्स उपलब्ध करेल त्यानंतर  अटी- शर्तींसह ही परवानगी देण्यात आली आहे. आर्थिक स्थिती चांगली नसल्यानं बँक खात्यांचा ताबा मिळण्यासाठी रियाने कोर्टात याचिका केली होती. बँक खात्यांसोबत फोन, मोबाईल वापराचीही परवानगी एनडीपीएस कोर्टाने दिली आहे. 


सुशांतने केली होती आत्महत्या.... 
सुशांत सिंह राजपूत यानं मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या निधनानंतर अनेक चर्चांना उधाण आलं. मुंबई पोलिसांशिवाय या आत्महत्येच्या तपासासाठी बिहार पोलीस, सीबीआयही पुढं आली. यानंतर सदर प्रकरणी अनेक धागेदोरे मिळत गेल्यामुळं ईडी आणि एनसीबी या यंत्रणांनीही त्यांच्या परिनं याचा तपास सुरु केला होता. ज्यामध्ये सुशांतची कथित प्रेयसी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचीही चौकशी करण्यात आली होती. सुशांतच्या कुटुंबीयांकडून रियावर काही गंभीर आरोप करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. वर्षभरानंतरही या प्रकणारची चर्चा सुरुच आहे. 


संबंधित बातम्या


Actor Siddharth Tweet: सायना नेहवालबद्दल ट्वीट करणं सिद्धार्थला भोवलं; नेटकऱ्यांनी केले ट्रोल


Bigg Boss 15 : आणखी दोन आठवड्यांनी लांबला 'ग्रँड फिनाले', 'या' दोन स्पर्धकांची होणार एंट्री!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha