Actor Siddharth Tweet : 'रंग दे बसंती' (Rang De Basanti) या चित्रपटातील अभिनयामुळे अभिनेता सिद्धार्थला (Siddharth) विशेष लोकप्रियता मिळाली. पण सध्या सिद्धार्थ त्याच्या चित्रपटांमधील अभिनयामुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सिद्धार्थने नुकतेच बॅडमिंटपटू सायना नेहवालबद्दल (saina nehwal) ट्वीट केले. या ट्वीटमुळे आता सिद्धार्थ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
काय आहे प्रकरण पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाभंग प्रकरणाबद्दल सायना नेहवालने ट्वीट केले होते. सायनाच्या ट्वीटवर भाष्य करत सिद्धार्थने त्याचे मत मांडले. सिद्धार्थने या ट्वीटमध्ये आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे सध्या त्याला अनेक जण ट्रोल करत आहेत. सिद्धार्थने त्याच्या ट्वीटमध्ये 'शेम ऑन यू रिहाना' असंही लिहिले होते. सिद्धार्थने ट्वीटमध्ये वापरलेल्या शब्दाचा निषेध करत महिला आयोगाने त्याला नोटीस पाठवली आहे.
संबंधित बातम्या
Tejas Barve and Amruta Dhongade : ‘मिसेस मुख्यमंत्री’ ची जोडी मोठ्या पडद्यावर करणार ‘दिशाभूल’