Ranbir Kapoor in SS Rajamouli Next Movie : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) बाहुबली दिग्दर्शक एसएस राजामौलींच्या आगामी सिनेमाचा हिरो असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टमुळे रणबीर कपूर आणि एसएस राजामौली यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. राजामौली आणि आलियाचा आरआरआर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान आलियामुळे रणबीर कपूर आणि राजामौली यांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आगामी सिनेमात रणबीरला कास्ट करण्याचे ठरवले. आरआरआरनंतर एसएस राजामौली साऊथचे सुपरस्टार महेश बाबूसोबत सिनेमा करणार आहेत. याच सिनेमात आलिया आणि रणबीरदेखील झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ब्रह्मास्त्रमुळे रणबीर कपूर चर्चेत
रणबीरचा ब्रह्मास्त्र सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. ब्रह्मास्त्र व्यतिरिक्त रणबीर कपूर शमशेरा (Shamshera), अॅनिमल (Animal) सिनेमात दिसणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'बैजू बावरा' सिनेमातदेखील रणबीर असू शकतो. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
आरआरआर (RRR)
बहुचर्चित 'आरआरआर' (RRR) सिनेमाची प्रेक्षक गेली अनेक दिवस प्रतीक्षा करत आहेत. एसएस राजामौलींची आगामी 'आरआरआर' सिनेमा 7 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 'आरआरआर' सिनेमाच्या निर्मात्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्वीट शेअर करत त्यांनी लिहिले आहे,"प्रेक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे".
संबंधित बातम्या
Sushant Singh Rajput case : रिया चक्रवर्तीनंतर आणखी दोन आरोपींची खाती गोठवली, न्यायालयाने एनसीबीला फटकारले
Viral video : कतरिना भांडी घासतेय... विकी लोणी-पराठे खातोय....रंगलाय कतरिना-विकीचा संसार; व्हिडीओ होतोय व्हायरल
Bigg Boss 15 : आणखी दोन आठवड्यांनी लांबला 'ग्रँड फिनाले', 'या' दोन स्पर्धकांची होणार एंट्री!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha