एक्स्प्लोर
Advertisement
'सचिन-रेखा राजीनामा का देत नाहीत?' राज्यसभेत खासदाराचा सवाल
नवी दिल्ली : राज्यसभेचे खासदार असलेला मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि दिग्गज अभिनेत्री रेखा यांच्या राज्यसभेतील गैरहजेरीबाबत अनेकदा टीकेची झोड उठली आहे. मात्र समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी 'सचिन आणि रेखा यांना इंटरेस्ट नसेल, तर ते खासदारकीचा राजीनामा का देत नाहीत?' असा थेट सवाल विचारला आहे.
'सचिन तेंडुलकर किंवा रेखा यांच्यासारखे अनेक राज्यसभेचे सदस्य वारंवार गैरहजर असतात. याचा अर्थ त्यांना राज्यसभेच्या कामकाजात रस दिसत नाही. मग असं असेल तर ते दोघं पदाचा राजीनामा का देत नाहीत?' असा प्रश्न अग्रवाल यांनी उपस्थित केला.
'मी सुरुवातीपासूनच या सदस्यांना सभागृहात पाहिलेलं नाही' असं अग्रवाल यांनी सांगताच गैरहजर राहणाऱ्या सदस्यांना उपस्थित राहण्यास तयार करा, असं राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांनी अग्रवाल यांना सुचवलं. त्यामुळे अग्रवाल यांनी गैरहजर राहणाऱ्या सदस्यांना पत्र लिहून उपस्थित राहण्याची विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे.
कला, साहित्य, विज्ञान, सामाजिक शास्त्र अशा विविध क्षेत्रातील 12 सदस्यांचं राज्यसभेचं खासदार म्हणून नामांकन करण्यात आलं. रेखा, सचिन तेंडुलकर यांच्याशिवाय अनु आगा, संभाजी छत्रपती, स्वपन दासगुप्ता, रुपा गांगुली, नरेंद्र जाधव, एमसी मेरी कोम, के पारासरन, गोपी सुरेश, सुब्रह्मण्यम स्वामी आणि केटीएस तुलसी यांचा समावेश आहे.
सचिन तेंडुलकरने खासदार आदर्श ग्राम योजने अंतर्गत दोन गावं दत्तक घेतली आहेत. आंध्र प्रदेशातील पुत्तमराजु कांदरीगा आणि महाराष्ट्रातील डोणजा या दोन गावांचा विकास त्याने सुरु केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
धाराशिव
भारत
बातम्या
Advertisement