Ruturaj Gaikwad: क्रिकेटर ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) काल (28 नोव्हेंबर) विश्वविक्रम केला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy 2022) उपांत्यपूर्व फेरीमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराजनं उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केला. त्याच्या या धमाकेदार खेळीनंतर आता अभिनेत्री सायली संजीवच्या (Sayali Sanjeev) फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


सायलीनं शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करुन अनेकांनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे. तर काहींनी 'कालची मॅच पाहिली का?' असा प्रश्न सायलीला विचारला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'मॅच बघितली का वहिनी, काय बॅटिंग केलीय आमच्या भावाने.' 'आज आपल्या मित्राने म्हणजेच ऋतुराज गायकवाडनं मारले 7 भारी बॅटिंग केली.', 'ऋतु का राज' अशा कमेंट्स युझर्सनं केल्या आहेत.   


निळीची साडी, रेड ब्लाऊज आणि केसांमध्ये गजरा अशा ट्रेडिशनल लूकमधील फोटो सायलीनं शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.  


सायलीची पोस्ट:






सायलीच्या एका फोटोवर ऋतुराज गायकवाडनं कमेंट केली होती. त्यामुळे ऋतुराज आणि सायली यांच्याबाबत सोशल मीडियावर चर्चा होत असते. 


सायलीच्या 'शुभमंगल ऑनलाईन' आणि 'काहे दिया परदेस' या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. सायलीने 'बस्ता', 'मन फकिरा' आणि 'सातारचा सलमान' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सायलीच्या 'झिम्मा' या चित्रपटातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केले. तिचा 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Sayali Sanjeev : साडी गर्ल... सायली संजीवच्या मनमोहक अदा; चाहते फिदा