Bhediya Box Office Collection Day 4:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) यांचा  भेडिया (Bhediya)  हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. हा चित्रपट शुक्रवारी (25 नोव्हेंबर) रिलीज झाला. पण चौथ्या मात्र या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण झाली आहे. जाणून घेऊयात भेडिया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...



  • पहिल्या दिवसाचे कलेक्शन- 7.48 कोटी

  • दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन- 9.57 कोटी

  • तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन-11.50 कोटी

  • चौथ्या दिवसाचे कलेक्शन- 3.85 कोटी

  • एकूण कलेक्शन- 32.40 कोटी


भेडिया हा चित्रपट पन्नास कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल की नाही? याचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. 


अमर कौशिक यांनी भेडिया या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. वरुण धवनच्या भेडिया या चित्रपटाची निर्मिती 60 कोटींमध्ये करण्यात आली आहे. चित्रपटात हॉरर आणि कॉमेडीचा तडका आहे. हा चित्रपट प्रेक्षक 3Dमध्ये  पाहू शकतात. चित्रपटातील गाणी आणि चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अभिषेक बॅनर्जी, दीपक डोबरियाल आणि पॉलिन कबाक यांनी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. 



वरुण आणि क्रिती यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत.  क्रिती ही  आदिरुपुरुष या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर वरुणचा बवाल हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Bhediya Box Office Collection Day 2: वरुणच्या 'भेडिया' नं बॉक्स ऑफिसवर केला कल्ला; जाणून घ्या कलेक्शन