Bollywood Movies in Ukraine : यूक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) यांच्यात सुरु असलेला वाद अद्याप संपण्याचं नाव घेत नाही. रशिया मागे हटण्यास तयार नसल्याने वाद आणखी वाढणार असे दिसत असून सर्व जगाचे लक्ष याकडे लागून आहे. यूक्रेन आणि रशिया यांच्यातील वादामुळे विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवर (Economy) परिमाण होत असून भारतातील शेअर बाजारालाही याचा फटका बसला आहे. दरम्यान वाद सुरु असलेल्या याच युक्रेन देशात अनेक बॉलीवुड चित्रपटांची शूटींग पार पडली असून यातील काही खास चित्रपट खालीलप्रमाणे...
आर आर आर (RRR)
अजय देवगन, जूनियर एनटीआर आणि रामचरण अशी तगडी स्टारकास्ट असणारी बिग बजेट फिल्म आरआरआरचं शूट यूक्रेनमध्ये झालं आहे. एस.एस. राजामाऊली यांच्या या फिल्मचा एक पार्ट युक्रेनमध्ये शूट करण्यात आला आहे.
टायगर 3 (Tiger 3)
सलमान खान आणि कतरीना कैफ यांचा आगामी चित्रपट टायगर 3 चं शूटींगही यूक्रेनमधील एका शहरात झालं आहे. या शहरातील अप्रतिम लोकेशन पाहिल्यानंतर शूट करण्यासाठी फिल्ममेकर्स युक्रेनला पोहोचले होते.
2.0
अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा 2.0 या चित्रपटाचं यूक्रेनमध्ये शूट झालं आहे. या चित्रपटातील गाणं टनल ऑफ लव्हमध्ये शूट करण्यात आलं आहे.
विनर (Winner)
बॉलीवूडचं नाही तर तेलगु सिनेसृष्टीतील काही चित्रपटाचं शूटही युक्रेनमध्ये झालं आहे. याती एक म्हणजे विनर फिल्म. यामध्ये साई धरम तेज आणि रकुल प्रीत सिंह अशी स्टारकास्ट असून या सिनेमाचं बहुतांश चित्रीकरण युक्रेनमध्ये झालं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमधील वादाचा फटका फुटबॉलला, चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत महत्त्वाचा बदल
- F1 Russian Grand Prix : फॉर्मुला 1 ही रशियाविरुद्ध आक्रमक, यंदाची रशियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा रद्द
- Russia-Ukraine Conflict : भारत सरकारचं मिशन एअरलिफ्ट, AIR INDIA चे दोन विशेष विमान तयार ठेवण्याचे आदेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha