Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर हल्ला केला असून आज युद्धाचा दुसरा दिवस आहे. या युद्धाचे पडसाद जगभरात उमटत आहे. विविध देशांच्या अर्थव्यवस्थेला याचा फटका बसत असताना आता क्रिडा क्षेत्रालाही याचा फटका बसला आहे. प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्याचं ठिकाण या युद्धामुळे बदलण्यात आलं आहे. आधी या स्पर्धेचा अंतिम सामना रशियातील प्रसिद्ध फुटबॉल स्टेडियम सेंट पीटर्सबर्ग येथे होणार होता. पण आता हे ठिकाण बदलून पॅरिस करण्यात आलं आहे.
28 मे रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथे खेळवण्यात येणार होता. पण रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर आता चॅम्पियन्स लीग समितीने हे ठिकाण बदलून पॅरिस केलं आहे. आता हा सामना फ्रान्समधील सेंट डेनीस या मैदानात खेळवण्यात येणार आहे. UEFA ने एक निवेदन जारी करून त्यात म्हटले आहे की, "UEFA कार्यकारी समितीने 2021-22 UEFA पुरुष चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथून फ्रान्सच्या सेंट डेनिस येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना नियोजित वेळेनुसार शनिवारी 28 मे रोजी 9 वाजता खेळला जाईल.
UEFA ने मानले फ्रान्सचे आभार
दरम्यान UEFA कार्यकारी समितीने फ्रेंच रिपब्लिकचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अशा तणावपूर्ण परिस्थितीत सर्वात मानाच्या फुटबॉल स्पर्धेबाबत दाखवलेलं वैयक्तिक समर्थन याबाबत धन्यवाद व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine War: युक्रेनने शस्त्र खाली टाकल्यास चर्चेस तयार; रशियाची भूमिका
- Russia Ukraine War : रशियाने ब्रिटनशी घेतला बदला, सर्व ब्रिटीश विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केले
- Russia-Ukraine Conflict : भारत सरकारचं मिशन एअरलिफ्ट, AIR INDIA चे दोन विशेष विमान तयार ठेवण्याचे आदेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha