Russian Grand Prix Cancelled: रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी गुरुवारी सकाळच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) युक्रेनवर आक्रमणाचे आदेश दिले. आता या युद्धाला दोन दिवस झाले असून अजूनतरी हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नसून या युद्धाचे पडसाद विविध क्षेत्रांवर उमटत आहेत. आधी फुटबॉल स्पर्धा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्याचं ठिकाण या युद्धामुळे रशियातून बदलून फ्रान्स करण्यात आल्यानंतर आता प्रसिद्ध रेसिंग स्पर्धा फॉर्मुला 1 (Formula 1) ची रशियातील रशियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा ही रद्द करण्यात आल्याचं F1 ने ट्वीट करत कळवलं आहे.



फॉर्मुला 1 ने ही स्पर्धा रद्द करण्यामागे सध्या रशिया-युक्रेन वादाचं कारण दिलं आहे. त्यांनी निवेदनात म्हटलं आहे की,'फॉर्मुला 1 स्पर्धेचा मुख्य हेतू जगभरात सकारात्मक वातावरण निर्माण करुन विविध देशांना एकत्र आणणं हा उद्देश असतो. पण सध्या युक्रेनमध्ये सुरु असलेल्या वादांना पाहता हे सर्व फार धक्कादायक असून या परिस्थितीत बदल होणं फार गरजेचं आहे. दरम्यान गुरुवारी समितीने केलेल्या चर्चेतून सध्यातरी रशियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा घेणं शक्य नसल्याचं निश्चित केलं आहे.' 


चॅम्पियन्ल लीग स्पर्धेलाही फटका


प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्याचं ठिकाण या युद्धामुळे बदलण्यात आलं आहे. आधी या स्पर्धेचा अंतिम सामना रशियातील प्रसिद्ध फुटबॉल स्टेडियम सेंट पीटर्सबर्ग येथे होणार होता. पण आता हे ठिकाण बदलून पॅरिस करण्यात आलं आहे. 28 मे रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथे खेळवण्यात येणार होता. पण रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर आता चॅम्पियन्स लीग समितीने हे ठिकाण बदलून पॅरिस केलं आहे. आता हा सामना फ्रान्समधील सेंट डेनीस या मैदानात खेळवण्यात येणार आहे. UEFA ने एक निवेदन जारी करून त्यात म्हटले आहे की, "UEFA कार्यकारी समितीने 2021-22 UEFA पुरुष चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथून फ्रान्सच्या सेंट डेनिस येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना नियोजित वेळेनुसार शनिवारी 28 मे रोजी 9 वाजता खेळला जाईल.  


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha