Madhuri Dixit : बॉलिवूडची धकधक गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितनं (Madhuri Dixit) ओटीटीवर पदार्पण केलं आहे. माधुरीची पहिली वेब सीरिज 'द फेम गेम' (The Fame Game) ही आज (25 फेब्रुवारी) रिलीज झाली आहे. सध्या या सीरिजचं माधुरी आणि या सीरिजची टीम प्रमोशन करत आहे. या वेब सीरिजमधून जवळपास 27 वर्षानंतर माधुरी आणि अभिनेता संजय कपूर यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच माधुरीनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये माधुरी रेट्रो लूकमध्ये दिसत आहे.
माधुरीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती आणि मानव कौल (Manav Kaul) हे 'अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओला कमेंट करून नेटकऱ्यांनी माधुरीला मधुबाला यांची उपमा दिली आहे. तर काहींनी माधुरीच्या एक्सप्रेशनचं कौतुक केलं आहे.
'द फेम गेम' या सीरिजमध्ये माधुरीसोबत संजय कपूर, मानव कौल, सुहासिनी मुले, लक्ष्यवीर सरन हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.' या सीरिजचे दिग्दर्शन बिजॉय नांबियार आणि करिश्मा कोहली यांनी केले आहे. तसेच श्रीराव यांनी या सीरिजचे कथानक लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- राज्यातील ईडी कारवाईवर अभिनेता संदीप पाठक म्हणतो.....
- Mahesh Bhatt : महेश भट यांनी सांगितला आलियाच्या बालपणीचा किस्सा; म्हणाले...
Vikram Vedha : सैफ अली खानचा 'विक्रम वेधा' मधील लूक रिलीज ; करिना म्हणाली...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha