Rishi Kapoor Neetu Kapoor Love Life: नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि ऋषी कपूर (Rishi Kapoor) ही सत्तरचे दशक गाजवणारी जोडी खऱ्या आयुष्यातही एक आदर्श जोडी होती. 2020 साली ऋषी कपूरने जगाचा निरोप घेतला आणि ही जोडी तुटली. पण लग्न झाल्यानंतरही ऋषी कपूरचे अनेक अफेअर सुरू होते, त्यातील कितीतरी वन नाईट स्टॅन्ड अफेअर पकडल्याचा धक्कादायक खुलासा नितू कपूर यांनी एका मुलाखतीच्या वेळी केला.


नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि ऋषी कपूर (Rishi Kapoor) या दोघांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. चित्रपट करत असताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर लग्नबंधनात अडकले. पण त्यानंतरही ऋषी कपूर अनेक मुलींशी फ्लर्ट करत असल्याचं नितू कपूर यांनी सांगितलं. 


नीतू कपूर यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना ऋषी कपूरच्या सर्व अफेअर्सची माहिती होती. ऋषी कपूर हे अनेक मुलींशी फ्लर्ट करतानाही त्यांनी पाहिले होते. पण ते सर्व फ्लर्ट हे फक्त वन नाईट स्टँड आहेत. या सर्व गोष्टींवरून मी त्याच्याशी खूप भांडत असे. 


तू हे किती दिवस करतोस हे मी पण बघणार आहे असा दम ऋषी कपूर यांना दिला होता असंही नीतू कपूर यांनी त्या मुलाखतीत सांगितलं होतं. 


ऋषी कपूर अनेक गोष्टींसाठी माझ्यावर अवलंबून 


त्यादरम्यान नीतू कपूर यांनी असेही सांगितले होते की, 'आता आम्ही एकमेकांबद्दल खूप विश्वासू झालो आहोत. कारण मला माहित होते की त्याच्यासाठी त्याचे कुटुंब पहिले आहे. मला हे देखील माहित आहे की तो अनेक गोष्टींसाठी माझ्यावर अवलंबून आहे, म्हणून तो मला कधीही सोडणार नाही. हो, पण तो स्वभावाने थोडा नटखट आहे, त्याला बांधून ठेवता येणार नाही.


जहरीला इंसान चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट 


ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची पहिली भेट 'जहरीला इंसान'च्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी नीतू कपूर या फक्त 15 वर्षांची होत्या. इथून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली आणि नंतर प्रेम झाले. या जोडीला रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर असे दोन अपत्ये आहेत. 


ही बातमी वाचा: