Shah Rukh Khan Dance: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा प्रीव्यू काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. प्रीव्यूमध्ये शाहरुख खानच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधळे. या प्रीव्यूच्या शेवटी दिसते की शाहरुख हा मेट्रोमध्ये 'बेकरार करके हमें यूँ न जाइये' या गाण्यावर डान्स करत आहे. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक जण शाहरुखच्या या डान्सचं कौतुक करत आहेत. जाणून घेऊयात शाहरुखच्या या डान्सबद्दल...
शाहरुखनं स्वत:च केली कोरिओग्राफी
जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमधील सीनमध्ये मेट्रोमधील प्रवासी घाबरलेले दिसत आहेत. तेव्हा शाहरुख खान अचानक 'बेकरार करके हमें यूँ न जाइये' या गाण्यावर नाचायला लागतो. हे गाणे 1962 मध्ये आलेल्या 'बिस साल बाद' चित्रपटातील आहे. शाहरुखच्या जवानच्या प्रीव्यूमधील या डान्सची कोरिओग्राफी कोणी केली आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. रिपोर्टनुसार, या गाण्यातील डान्स स्टेप्स शाहरुख खानने कोरिओग्राफ केल्या आहेत. शाहरुखच्या या डान्सचं कौतुक अनेक जण करत आहेत.
शाहरुख खानने नुकतेच आस्क मी एनीथिंग सेशनमध्ये या गाण्याबद्दल सांगितले. या गाण्याची कल्पना दिग्दर्शक अॅटली यांची असल्याचे त्याने सांगितले. जवानच्या प्रीव्यूचं सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केलं आहे.
पाहा व्हिडीओ:
जवान (Jawan) या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपती, सुनील ग्रोवर प्रियमणी, सान्या मल्होत्रा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या शाहरुखच्या पठाण या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली आता पठाण या चित्रपटाप्रमाणेच जवान हा चित्रपट देखील हिट ठरेल का? हे लवकरच कळेल. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज केला जाणार आहे.
पाहा जवान चित्रपटाचा प्रीव्यू
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: