Republic Day 2025 : 'सॅम बहादुर' ते 'बॉर्डर', प्रजासत्ताक दिनी OTT वर पाहा 'हे' देशभक्तिपर चित्रपट
Top 5 Patriotic Films On OTT : प्रजासत्ताक दिनी तुम्ही ओटीटीवर दमदार देशभक्तिपर चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता.
Republic Day 2025 Special OTT Content : 26 जानेवारी 2025 रोजी भारताचा प्रजासत्ताक दिना मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदा भारत 76 वा प्रजासत्ताक साजरा करत आहे. या खास दिवशी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवत ओटीटी कंटेट पाहण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. प्रजासत्ताक दिनी तुम्ही ओटीटीवर देशभक्तिपर चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. ओटीटीवर उत्तम चित्रपट स्ट्रीम होत आहे, ज्यामध्ये देशभक्तिची भावना आणि देशप्रेम दाखवण्यात आलं आहे. आम्ही आज तुमच्यासाठी ओटीटीवर दमदार देशभक्तिपर चित्रपटांची यादी घेऊन आलो आहोत.
चित्रपट - बॉर्डर
देशभक्तिपर चित्रपटांच्या यादीमधील बॉर्डर हा कल्ट सिनेमा आहे. आजही या चित्रपटाचं प्रेक्षकांच्या मनातील खास स्थान कायम आहे. या प्रजासत्ताक दिनी तुम्हीही 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाची कहाणी असलेला बॉर्डर चित्रपट पाहू शकता. या चित्रपटात सनी देओल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना आणि पूजा भट्ट हे कलाकार आहेत. 1997 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट युद्धावर आधारित आहे. हा चित्रपट तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
चित्रपट - फायटर
गेल्या वर्षी 26 जानेवारी रोजी 'फायटर' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात भारतीय वायुसेना पाकिस्तानी सैन्याकडून बालाकोट स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्याचा बदला घेतानाची कहाणी आहे. 'फायटर' चित्रपटामध्ये हृतिक रोशन, अनिल कपूर, दीपिका पदुकोण आणि करण सिंह ग्रोव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट स्ट्रीम होत आहे.
चित्रपट - सॅम बहादूर
या प्रजासत्ताक दिनी तुम्ही तुमच्या कुटुंबासह विकी कौशलचा 'सॅम बहादूर' हा चित्रपट पाहून प्रजासत्ताक दिन खास बनवू शकता. हा चित्रपट भारताचे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5 वर तुम्हाला हा चित्रपट पाहता येईल.
चित्रपट - उरी : द सर्जिकल स्ट्राईक
'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' ही मेजर विहान सिंह शेरगिलची कथा आहे. भारतीय सैन्यावर भ्याड पुलवामा हल्ल्याचा बदला घेणाऱ्या उरी सर्जिकल स्ट्राईकची कथा प्रेक्षकांना फार आवडली काश्मीरमधील उरी येथील एका तळावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाविरुद्ध गुप्त कारवाईचे नेतृत्व करतात. 'उरी' चित्रपटात विकी कौशल, यामी गौतम, परेश रावल, मोहित रैना आणि कीर्ती कुल्हारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तुम्ही हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5 वर पाहू शकता.
चित्रपट - मिशन मजनू
प्रजासत्ताक दिनी तुम्ही 'मिशन मजनू' हा चित्रपट देखील पाहू शकता. 'मिशन मजनू' चित्रपट भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. हे एका रॉ एजंटच्या मोहिमेवर आधारित आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर तुम्हाला मिशन मजनू चित्रपट पाहता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :