एक्स्प्लोर
महिलेला अश्लील फोटो पाठवल्याप्रकरणी एजाज खानला जामीन
मुंबई : बिग बॉस फेम अभिनेता एजाज खानची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. 38 वर्षीय महिलेला अश्लील मेसेज, फोटो पाठवून छेडछाड केल्याप्रकरणी एजाज खानला राहत्या घरातून अटक झाली होती.
एजाजविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजाजनं अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून मानसिक त्रास दिल्याची तक्रार महिलेने केली आहे. त्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी मध्यरात्री एजाज खानला अटक केली.
गेल्या महिन्यात एजाजने आपल्याला फेसबुकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग करायला सुरुवात झाली. आपण एजाजच्या एका प्रोफाईल फोटोचं कौतुक केलं असता, त्याने आक्षेपार्ह सेल्फी पाठवला. असं तक्रारकर्त्या महिलेने म्हटलं आहे. संबंधित महिला मुंबईच्या मालवणी भागात स्वतःचं बूटिक चालवते.
एजाजला कोर्टात हजर करण्यात आलं असता, 10 हजार रुपयांच्या जामीनावर त्याची सुटका करण्यात आली. दरम्यान आपण सेलिब्रेटी असल्यामुळे संबंधित महिलेने आरोप केले असून हा पब्लिसिटी स्टंट असल्याचा दावा एजाजनं केला आहे.
एजाज खान बिग बॉसच्या सातव्या पर्वात झळकला होता. त्याशिवाय त्याने काही हिंदी, तेलगू चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement