एक्स्प्लोर

Raveena Tandon: "ना सत्ता, ना पैसा, ना नियम..."; कर्मा कॉलिंग सीरिजचा ट्रेलर रिलीज

Raveena Tandon: रवीना लवकरच कर्मा कॉलिंग या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

Karmma Calling Trailer:  बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. रवीनाचा चाहता वर्ग मोठा आहे. रवीनानं बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीमधून ब्रेक घेतला होता. आता रवीना ही ओटीटीवरुन पुनरागमन करणार आहे. रवीना लवकरच कर्मा कॉलिंग या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. नुकताच या सीरजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

रवीना साकारणार इंद्राणीची भूमिका

रवीना टंडनच्या कर्मा कॉलिंग या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरची सुरुवात  रवीनाच्या स्टेजरवरील एन्ट्रीने होते. यावेळी ती एका अत्यंत शक्तिशाली महिलेच्या अवतारात दिसत आहे. या सीरिजमध्ये रवीना ही इंद्राणीची भूमिका साकारणार आहे जी प्रसिद्धीसाठी काहीही करू शकते. 

डिस्ने प्लस हॉटस्टारने कर्मा कॉलिंग या वेब सीरिजचा ट्रेलर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यांनी कॅप्शन दिलं, "ना सत्ता, ना पैसा, ना नियम, इंद्राणीला कोणीही तोंड देऊ शकत नाही. जेव्हा ती तिच्या कर्मांचा सामना करेल तेव्हा काय होईल?"

पाहा ट्रेलर

View this post on Instagram
 
A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

'कर्मा कॉलिंग'ची स्टार कास्ट

कर्मा कॉलिंग या सीरिजमध्ये रवीना टंडनशिवाय वरुण सूद, विक्रमजीत विर्क, वालुशा डिसूझा, गौरव शर्मा, विराफ पटेल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रवीना टंडनची 'कर्मा कॉलिंग' या वेब सीरिज 'रिवेंज' या अमेरिकन सीरिजवर आधारित आहे.

कधी रिलीज होणार सीरिज?

रवीना टंडनची 'कर्मा कॉलिंग' ही वेब सिरीज  26 जानेवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन 'गिल्टी' फेम दिग्दर्शक रुचि नरेन यांनी केले आहे. सध्या रवीना बी डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखलाजा 11' मध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. 

रवीनाचा आगामी चित्रपट

रवीनाचा 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रवीनासोबत अक्षय कुमार, संजय दत्त, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, तुषार कपूर, श्रेयस तळपदे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या:

VIDEO: अरबाज आणि मलायकाचा मुलगा रवीनाच्या लेकीला करतोय डेट? अरहान आणि राशाच्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MNS च्या Mahayuti तल्या एन्ट्रीला शिंदेंकडून ब्रेक? भाजप मनसेला दत्तक घेणार? Special ReportDhananjay Munde : धंनजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा, वाढता विरोध तरी दादा पाठिशी Special ReportMahamudde Mumbai Highway : प्रवास उपेक्षितच, मुंबई-अहमदाबाद महामार्गाची अवस्था पाहाMahapalikeche Ahilyanagar water: चार दिवसाआड पाणी, अहिल्यानगरचा पाणीपुरवठा सुरळीत कधी होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
Embed widget