Rashmika Mandanna: नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी रश्मिकाचा वाढदिवस होता. या निमित्तानं तिच्या अनेक चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. रश्मिकानं एक व्हिडीओ शेअर करुन सर्व चाहत्यांचे आभार मानले. रश्मिकानं व्हिडीओ शेअर केल्यानंतर रश्मिका आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. आता या चर्चेवर नुकतीच रश्मिकानं प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रश्मिका आणि विजयच्या नात्याची चर्चा होत आहे. आता या चर्चेवर रश्मिकानं भाष्य केलं आहे. रश्मिकानं तिच्या वाढदिवसाला एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओचा स्क्रिनशॉर्ट आणि विजयचा फोटो एका नेटकऱ्यानं ट्विटरवर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं की, 'विजय आणि रश्मिका हे एकमेंकांना डेट करत आहेत.ते दोघे एकाच घरात राहात आहेत.' नेटकऱ्याच्या या पोस्टला रश्मिकानं रिप्लाय दिला आहे.
रश्मिकानं नेटकऱ्याच्या ट्वीटला रिप्लाय दिला, 'अय्यो... जास्त विचार नको करु बाबू'. रश्मिकाच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
रश्मिकाचे चित्रपट
काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदनाचा Vairsu हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या दिग्दर्शन वामशी पैडिपल्ली यांनी केले आहे. या चित्रपटात विजय आणि रश्मिका यांच्या व्यतिरिक्त शाम, प्रभू आणि प्रकाश राज या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. पुष्पा-2 या चित्रपटामधून रश्मिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रश्मिकाचा पुष्पा-2 मधील लूक काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला.
रश्मिका ही तिच्या ग्लॅमरस अदा आणि स्टाईलनं प्रेक्षकांना घायाळ करते. पुष्पा या चित्रपटामधून तिला विशेष लोकप्रियता मिळाली. गुडबाय या चित्रपटामधून रश्मिकानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात रश्मिकासोबतच अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, एली अविराम, सुनील ग्रोवर, साहिल मेहता आणि पावेल गुलाटी या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती. याशिवाय रश्मिकाचा मिशन मजनू हा चित्रपट देखील काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Rashmika Mandanna : 'तेरी झलक अशरफी, श्रीवल्ली...'; रश्मिकाचा 'पुष्पा 2' मधील लूक आऊट