Amisha Patel : सिने-अभिनेत्री आणि निर्माती अमिषा पटेलच्या (Amisha Patel) अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्रीविरोधात न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. अनेकदा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतरही हजर न झाल्यामुळे अमिषा पटेलविरोधात झारझंडमधील (Jharkhand) रांची दिवाणी न्यायालयाने (Ranchi Diwani Court) वॉरंट जारी केलं आहे. 


झारखंड येथील रांची दिवाणी न्यायालयाने अमिषा पटेल आणि तिचा बिझनेस पार्टनस कुणाल विरुद्ध फसवणूक, धमकी आणि चेक बाऊन्स प्रकरणी वॉरंट जारी केलं आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 एप्रिलला होणार आहे.


नेमकं प्रकरण काय? 


मीडिया रिपोर्टनुसार, अरगोरा येथे राहणाऱ्या अजय कुमार सिंह यांनी 2018 साली अमिषा पटेल विरोधात गुन्हा दाखल केला होता. तक्ररीत त्यांनी म्हटलं होतं, अमिषा पटेलने सिनेमा बनवण्याच्या नावाखाली आमच्याकडून अडीच कोटी रुपये घेतले होते. पण अद्याप या सिनेमाची निर्मिती झालेली नाही. तसेच अमिषाने आम्हाला पैसेही परत केलेले नाहीत. 


अजय कुमार यांच्या तक्रारीनुसार, अमिषा पटेल आणि तिचा भागीदार असलेल्या कुणालने सिनेमा पूर्ण झाल्यानंतर व्याजासह पैसे परत करणार असल्याचं सांगितलं होतं. 'देसी मॅजिक' या सिनेमाचं शूटिंग 2013 मध्ये सुरू झालं होतं. पण अद्याप हा सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. सिनेमा प्रदर्शित न झाल्याने अजय कुमार यांनी अभिनेत्रीकडे पैसे मागितले. त्यानंतरही अभिनेत्रीने अजय कुमार यांना त्यांचे पैसे परत केलेले नाहीत. अमिषाने ऑक्टोबर 2018 साली अजय कुमार यांना 2.5 कोटी आणि 50 लाख रुपयांचे दोन चेक दिले होते. पण ते बाऊन्स झाले. 


आता रांची येथील दिवाणी न्यायालयाने अमिषा विरोधात वॉरंट जारी केलं आहे. अनेक वेळा समन्स पाठवल्यानंतरही कोर्टात हजर न झाल्याने तसेच तिच्या वकिलांनादेखील कोर्टात पाठवत नसल्याने अमिषा विरोधात वॉरंट जारी करण्यात आलं आहे. अभिनेत्रीविरोधात तक्रार करणारे अजय कुमार सिंह हे झारखंडमधील सिने-निर्माते आहेत. 


अमिषा पटेल कोण आहे? (Who is Amisha Patel)


अमिषा पटेल ही बॉलिवूडची लोकप्रिय सिने-अभिनेत्री आणि निर्माती आहे. अमिषाने 2000 साली 'कहो ना प्यार है' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात ती ऋतिक रोशनसोबत झळकली होती. त्यानंतर तिने 'गदर एक प्रेम कथा', 'आप मुझे अच्छे लगने लगे' या लोकप्रिय सिनेमांत काम केलं.


संबंधित बातम्या


Kiccha Sudeep : भाजपप्रवेशाच्या चर्चेदरम्यान किच्ची सुदीपला मिळालं धमकीचं पत्र; एफआयआर दाखल