Rashmika Mandanna New Look Poster Out : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आपला 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज दाक्षिणात्य सिनेसृष्टी, बॉलिवूडच्या कलाकारांसह चाहतेदेखील नॅशनल क्रशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' (Pushpa) या सिनेमातील श्रीवल्लीच्या भूमिकेमुळे रश्मिकाला जगभरात लोकप्रियता मिळाली आहे. आता या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज रश्मिकाच्या वाढदिवसानिमित्त 'पुष्पा 2'मधील (Pushpa 2) रश्मिकाचा लुक समोर आला आहे.
'पुष्पा 2' संदर्भात अनेक अपडेट समोर येत आहेत. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्नाच्या (Rashmika Mandanna) 'पुष्पा' (Pushpa) या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदान्नाच्या अभिनयाचंदेखील प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं. या सिनेमात रश्मिका श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसून आली होती.
रश्मिकाच्या वाढदिवसानिमित्त आज 'पुष्पा 2' सिनेमातील तिचा लुक आऊट करण्यात आला आहे. या लुकमध्ये रश्मिका खूपच गोड दिसत आहे. सोशल मीडियावर रश्मिकाचा हा फोटो व्हायरल होत आहे. 'पुष्पा 2' या सिनेमातील श्रीवल्लीचा लुक आऊट करत निर्मात्यांनी रश्मिका मंदान्नाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
'पुष्पा 2'चा टीझर आऊट! (Pushpa 2 Teaser Out)
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाच्या 'पुष्पा 2' या सिनेमाचा पहिला टीझर आऊट झाला आहे. हा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या टीझरमध्ये 'पुष्पा' तुरुंगातून फरार झाल्याचे दिसत आहे. आता अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी 8 एप्रिललादेखील 'पुष्पा'च्या चाहत्यांना खास भेट मिळणार आहे.
अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 2021 साली प्रदर्शित झालेला 'पुष्पा' हा सिनेमा सुपरहिट ठरला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह जगभरात या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळाली आहे. या सिनेमातील गाणी, डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे आता 'पुष्पा 2' या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा' सिनेमाच्या पहिल्या भागात अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.
संबंधित बातम्या