Rani Mukerji on Miscarriage : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) यांनी नुकताच आपला 46 वा वाढदिवस साजरा केला आहे. राणी यांनी आपल्या करिअरमध्ये आजवर अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. राणी मुखर्जी यांनी नुकतचं एका मुलाखतीत दुसऱ्यांदा आई न होऊ शकल्याची खंत व्यक्त केली आहे. मुलीला भावंड देऊ शकत नसल्याचं दु:ख आहे, असं त्या म्हणाल्या आहेत. 


राणी मुखर्जी यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. 'Indian Film Festival of Melbourne'च्या मंचावर राणी मुखर्जी यांनी मिसकॅरेजबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं होतं. आता पुन्हा एकदा गलाट्टा इंडियासोबत बोलताना त्यांनी या विषयावर भाष्य केलं आहे.


दुसऱ्यांदा आई न होऊ शकल्याचं राणी मुखर्जींना दु:ख


गलाट्टा इंडियासोबत बोलताना राणी मुखर्जी यांनी आपल्या प्रेग्नंसीबाबत भाष्य केलं आहे. आदिराच्या जन्मानंतर राणी मुखर्जी यांनी लगेचच सेकंड चान्स घेतला होता. पण यात त्यांना यश आलं नाही आणि मिसकॅरेज झालं. याबद्दल बोलताना राणी मुखर्जी म्हणाल्या,"आदिराच्या जन्मानंतर सात वर्षे मी दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करत होते. माझी मुलगी आठ वर्षांची झाल्यानंतरही कुठेतरी मला दुसऱ्या बाळाची ओढ होती. माझे प्रयत्न सुरू होते. अखेर मी प्रेग्नंट झाले. पण मी माझं दुसरं बाळ गमावलं. माझ्यासाठी ही सर्व परिस्थिती प्रचंड त्रासदायक होती". 


राणी मुखर्जी पुढे म्हणाल्या,"आता दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करायचे माझे वय नाही. मुलीला भावंड देऊ न शकल्याचं मला दु:ख आहे. यासाठी मी आयुष्यभर मुलीची माफी मागायला तयार आहे. माझ्यासाठी आदिरा ही स्वप्नसुंदरी आहे. 


राणी मुखर्जी यांनी सिनेनिर्माता आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांच्यासोबत लग्न केलं होतं. 2014 मध्ये राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा लग्नबंधनात अडकले. राणी मुखर्जी यांनी 9 डिसेंबर 2015 मध्ये आदिराला जन्म दिला. आदिराला मीडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न रानी मुखर्जी यांनी केला आहे. 


राणी मुखर्जी यांच्या सिनेमांबद्दल जाणून घ्या.. (Rani Mukerji Movies)


राणी मुखर्जी या लोकप्रिय सिने-अभिनेत्री आहे. 1997 मध्ये 'राजा की आयेगी बारात' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण आमिर खानच्या 1998 मध्ये आलेल्या 'गुलाम' या सिनेमाने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. तर करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है' या सिनेमाने त्या सुपरस्टार झाल्या. आजवर त्यांना सात फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. 


संबंधित बातम्या


Rani Mukerji on Black’s OTT release : 19 वर्षानंतर ब्लॅक प्रेक्षकांच्या भेटीला; ओटीटी रिलीजनंतर राणी मुखर्जी भारावली, म्हणाली...