Black OTT Release : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) यांचा दमदार अभिनय असलेला 'ब्लॅक' चित्रपट (Black Movie OTT Release) 19 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ब्लॅक (Black Movie) हा चित्रपट हा बॉलिवूडमधील आयॉनिक चित्रपट समजला जातो. अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जीच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. आता 19 वर्षानंतर पुन्हा एकदा ब्लॅक रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रतिसादाने राणी मुखर्जी भारावून गेली आहे. 


संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांनी राणी मुखर्जीसोबत काम केले होते. ब्लॅकला नुकतीच 19 वर्षे पूर्ण झाली. ब्लॅकचे रिलीज सेलिब्रेट करण्यासाठी निर्मात्यांनी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज केला आहे. OTT वर लाँच झाल्यापासून, राणीला  जगभरातील चाहत्यांकडून आणि चित्रपटप्रेमींकडून खुप छान प्रतिक्रिया मिळत आहेत. 


राणी मुखर्जीने म्हटले की, “ब्लॅकला 19 वर्षांनंतरही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे हे पाहणे खूप जबरदस्त आणि आनंददायी क्षण आहे. माझ्या फिल्मोग्राफीमध्ये या चित्रपटाला विशेष स्थान आहे. दिग्गज अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा आणि माझा सर्वाकालिन आवडते चित्रपट निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करण्याचा अनुभव माझ्यासोबत कायम राहील असेही राणी मुखर्जीने म्हटले. 


राणी मुखर्जीने पुढे म्हटले की, “मला आनंद आहे की हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे आणि ज्यांनी 19 वर्षांपूर्वी  चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॅकची जादू पाहण्यास चुकले होते ते सर्व त्यांच्या स्क्रीनवर पाहून  त्याचे साक्षीदार होऊ शकतील. तुमचे काम अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचते हे पाहणे नेहमीच सुखद असल्याची भावना राणीने व्यक्त केली. 


ओटीटी रिलीजची अमिताभ बच्चन यांनी दिली होती माहिती 


ओटीटी रिलीजबाबत अमिताभ बच्चन यांनी आपल्या सोशल हँडलवर माहिती दिली होती. बिग बी यांनी ट्वीट करत म्हटले की, 19 वर्षांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता आम्ही नेटफ्लिक्सवर पहिल्या डिजीटल रिलीजचे सेलिब्रेशन करत आहोत. देवराज आणि मिशेल यांचा प्रवास आम्हा सगळ्यांसाठी प्रेरणादायी होता.
 






काय होती ब्लॅक चित्रपटाची कथा?


राणी मुखर्जीने ब्लॅकमध्ये एका अंध मुलीची भूमिका साकारली होती. सामान्य माणसाप्रमाणे शिकण्याची आणि जगण्याची इच्छा या चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखेत होती. त्याचवेळी अमिताभ यांनी या चित्रपटात देवराजची भूमिका साकारली होती, जो शिक्षक होता. चित्रपटात राणीचा सपोर्ट सिस्टीम बनला होता. चित्रपटातील संवाद आणि कथा प्रेक्षकांना खूप आवडली.