Sidhu Moosewala : पंजाबी गायक, रॅपर सिद्धू मुसेवाला (Siddhu Moosewala) याचे आई-बाबा पुन्हा एकदा पालक झाले आहेत. त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर सिंह (Charan Kau Singh) यांनी वयाच्या 58 व्या वर्षी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. वयाच्या 58 व्या वर्षी आई झाल्याने सिद्धूची आई चर्चेत आहे. चरण कौर यांनी IVF म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन (In Vitro Fertilisation) या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला आहे. हे तंत्रज्ञान नक्की काय आहे? सर्व महिलांना शक्य आहे का? जाणून घ्या..


IVF तंत्रज्ञान काय आहे? (What is IVF?)


नैसर्गिक गर्भधारणा (Natural Pregnancy) होत नसेल तर आयव्हीएफ (IVF) या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अनेक कारणांनी लोक या पर्यायाचा अवलंब करतात. डॉ. नैना पटेल यांनी बीबीसीला माहिती देत म्हटलं की, IVF ची सुरुवात 1978 मध्ये झाली आहे. IVF मध्ये स्त्रीबीज आणि पुरुष जोडीदाराचा शुक्राणू काही काळासाठी लॅबमध्ये ठेवलं जातो. पुढे भ्रूण तयार झाल्यानंतर त्याला महिलेच्या गर्भाशयात ठेवले जाते. त्यामुळे कोणत्याही वयोगटातील महिला IVF तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आई होऊ शकते. 


बीबीसीच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनची 34 वर्षीय नताली गुयानला एक गंभीर आजार होता. या आजारामुळे तिला प्रजननसंबंधी समस्या भेडसावत होत्या. पण 2024 मध्ये IVF च्या माध्यमातून तिने एका मुलाला जन्म दिला. ब्रिटनचीच आणखी एक महिला 38 वर्षीय हॉविस बैरेट यांना 2019 मध्ये आयव्हीएफच्या माध्यमातून दोन मुलं झाली. सिद्धू मुसेवालाच्या 58 वर्षीय आईने मुलाला जन्म दिला. 


IVF सुरक्षित आहे का? (How IVF Works)


मेनोपॉजनंतर IVF च्या माध्यमातून प्रेग्नंट राहणं खूपच अवघड आहे. मेनोपॉजचा अर्थ आहे की, महिलांच्या शरीरात स्त्रीबीज बनणं कठीण होतं. जसं जसं महिलांचं वय वाढतं तसं हार्मोन कमी होऊ लागतात. वय आणि प्रकृती या दोन्ही गोष्टींचा विचार आयव्हीएफसाठी केला जातो. 


'या' कारणाने सिद्धू मुसेवालाच्या आईला शक्य झालं IVF (Sidhu Moosewala Parents IVF Pregnancy)


स्त्रीरोगतज्ज्ञ रजनी जिंदल, यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवालाची आई फिट होती. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं. वय वाढल्यानंतर जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर तुमच्या तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. चरण कौर दररोज मेडिकल चेकअपसाठी रुग्णालयात येत असे. वय वाढल्यानंतर रक्तदाब वाढू शकतो, रक्तस्त्राव होऊ शकतो. पण चरण कौर यांची प्रकृती स्थिर होती. त्यांना कोणतेही आजार नव्हते. त्यामुळे IVF यशस्वीरित्या पार पडलं. 


वय वाढण्यासोबत शरीरात अनेक बदल होत असतात. डॉ. नयना पटेल यांनी बीबीसीला माहिती देत म्हटलं,"35 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या महिलांना 80% यश मिळतं. 35-40 वय असेल तर बाळ होण्याचं प्रमाण 60% आहे.


संबंधित बातम्या


Sidhu Moosewala : सिद्धू मुसेवालाच्या घरी पाळणा हलला! वयाच्या 58 व्या वर्षी बलकौर सिंह पुन्हा बापमाणूस, तंत्रज्ञानाने केली कमाल