IPL 2024 : 'आयपीएल 2024'चा (IPL 2024) हंगाम सुरू झाला आहे. चेन्नईतील 'आयपीएल 2024'च्या ओपनिंग सेरेमनीला (IPL 2024 Opening Ceremony) अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar), टायगर श्रॉफ (Tiger Shroff), सोनू निगम (Sonu Nigam), एआर रहमान (AR Rahman) या सेलिब्रिटींनी आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून भारतीयांचं चांगलच मनोरंजन केलं. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (CSK Vs RCB) या सामन्याआधी बॉलिवूडच्या सर्वच पार्ट्यांमध्ये झळकणाऱ्या ओरीने (Orry) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 'IPL 2024'मध्ये ओरीला कॉमेंट्री करताना पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. 


अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) 'बडे मियां छोटे मियां' (Bade Miyan Chote Miyan) या सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'IPL 2024'च्या ओपनिंग सेरेमनीला आले होते. यावेळी त्यांनी जय-जय शिवशंकर, देसी बॉईज, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी, बाला-बाला, हरे राम-हरे राम हरे कृष्णा हरे राम या गाण्यांवर डान्स केला. त्यानंतर खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये सोनू निगमने (Sonu Nigam) 'वंदे मातरम' गात भारतीयांची मने जिंकली. दुसरीकडे एआर रहमान (AR Rahman) आणि मोहित चौहान (Mohit Chauhan) यांनीदेखील रसिकांचं मनोरंजन केलं. या सर्व सेलिब्रिटींमध्ये ओरीला पाहून नेटकरी मात्र हैराण झाले. 


'आयपीएल 2024'चं प्रसारण एक नव्हे तर दोन ठिकाणी होत आहे. स्टार स्पोर्ट्सवर नवज्योत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) कॉमेंट्री करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे जिओ सिनेमावर (Jio Cinema) क्रिकेटविश्वातील दिग्गज मंजळी 12 भाषांमध्ये कॉमेंट्री करताना दिसत आहेत. 






'IPL 2024'मध्ये ओरीची कॉमेंट्री


सेलिब्रिटींसोबत दिसणारा ओरी 'IPL 2024'साठी जिओ सिनेमावरील कॉमेंट्री पॅनलमध्ये सामील झाला आहे. ओपनिंग सेरेमनीदरम्यान तो कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित होता. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) यांच्यासमोर त्याने आपला हेलिकॉप्टर शॉटली दाखवला. पुढे त्याने वीरेंद्रला त्याचा आवडता शॉट दाखवण्यात सांगितला. दरम्यान विरेंद्र म्हणाला,"मला षटकार मारायला आवडतं. त्यामुळे मी जर माझा आवडता शॉट मारला तर तो शूट करायला ओरीला स्टेडियमबाहेर जावे लागेल". 


ओरीला पाहून नेटकरी संतापले


'IPL 2024'च्या कॉमेंट्री बॉक्समधले ओरीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ओरी काय क्रिकेट एक्सपर्ट आहे का?, ओरी वर्ल्ड कपच्या हीरोंसोबत स्टेज शेअर करताना दिसत आहे, ओरीला सेलिब्रिटी मित्रांसोबत सेल्फी घ्यायला हवा, स्टार स्पोर्ट्स छपरी लोकांना का बोलावतं?, भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील काळा दिवस, ओरीपेक्षा आम्हाला बोलावयला हवं होतं, अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.


संबंधित बातम्या


PBKS vs DC : आयपीएलच्या दुसऱ्या मॅचमधील कशी असेल प्लेइंग इलेव्हन, दिल्ली की पंजाब, विजयाचा गुलाल कुणाला?