Swatantra Veer Savarkar Madgaon Express Box Office Collection : रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) आणि 'मडगांव एक्सप्रेस' (Madgaon Express) हे दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने आहेत. या दोन्ही सिनेमांकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. आता बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कोणत्या सिनेमाला यश आले आहे जाणून घ्या..


'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाच्या लेखन, दिग्दर्शनाची धुराही रणदीपने सांभाळली आहे. तर दुसरीकडे कुणाल खेमूने 'मडगांव एक्सप्रेस' (Madgaon Express) या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. दिव्येंदु शर्मा, प्रतीक गांधी आणि अविनाश तिवारी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 


बॉक्स ऑफिसवर कोणत्या सिनेमाचं पारडं जड? (Swatantra Veer Savarkar Madgaon Express Box Office Collection Day 1)


'स्वातंत्र्यवीर सावरकर' आणि 'मडगांव एक्सप्रेस' या दोन्ही सिनेमांचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. सिनेमांचं कौतुक होत असलं तरी बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हे कमी पडले आहेत. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar Box Office Collection) या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 1.15 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे 'मडगांव एक्सप्रेस' (Madgaon Express Box Office Collection) या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.5 कोटींची कमाई केली आहे.


'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाबद्दल जाणून घ्या... (Swatantra Veer Savarkar Movie Details)


'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमासाठी रणदीप हुड्डाने 26 किलो वजन कमी केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने ट्रान्सफॉर्मेशनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमात मुख्य भूमिकेत असण्यासोबत रणदीपने या सिनेमाची निर्मितीदेखील केली आहे.


'मडगांव एक्सप्रेस'बद्दल जाणून घ्या... (Madgaon Express Movie Details)


'मडगांव एक्सप्रेस' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा कुणाल खेमूने सांभाळली आहे. कुणालचा हा पहिलाच चित्रपट आहे. या विनोदी, नाट्यमय सिनेमात दिव्येंदु शर्मा, प्रतीक गांधी, अविनाश तिवारी, उपेंद्र लिमये, नोरा फतेही आणि छाया कदम हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) आणि 'मडगांव एक्सप्रेस' (Madgaon Express) या दोन्ही सिनेमांच्या कमाईत वीकेंडला आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. वीकेंड आणि होळी, धूलिवंदन या सुट्ट्यांचा सिनेमाला फायदा होणार आहे.


संबंधित बातम्या


Swatantra Veer Savarkar Review : प्रत्येक भारतीयाने पाहावा असा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’, वाचा रिव्ह्यू