एक्स्प्लोर

Swatantra Veer Savarkar : रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात; रिलीज डेटही जाहीर!

Swatantra Veer Savarkar : अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) दिग्दर्शित आणि अभिनित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे.

Swatantra Veer Savarkar : नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर निर्माते संदीप सिंह आणि आनंद पंडित यांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) दिग्दर्शित आणि अभिनित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली असून, वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त 26 मे 2023 रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

निर्माते आनंद पंडित या चित्रपटाबाबत बोलताना असे म्हणाले की, ‘या भूमिकेला पूर्ण न्याय देण्यासाठी रणदीप हुड्डाशिवाय दुसरा कोणताही अभिनेता असूच शकत नाही. शिवाय, या चित्रपटाचे दिग्दर्शनही रणदीपच करणार आहे त्यामुळे नक्कीच ही अभिमानाची बाब आहे.’

पाहा पोस्ट :

निर्माते संदीप सिंह म्हणाले की, ‘आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की, रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेसोबतच आमच्या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणूनही आपला ठसा उमटवणार आहे.’ ते पुढे म्हणाले की, ‘भारतीय आणि हिंदू या नात्याने स्वातंत्र्यवीर सावरकर हा आमच्यासाठी खास चित्रपट आहे. प्रत्येक भारतीयाने, विशेषत: तरुण पिढीने आपला इतिहास जाणून घ्यावा, अशी माझी इच्छा आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी वीर सावरकरांचे योगदान फार मोठे आहे. अशा या स्वातंत्र्यसैनिकाचा प्रवास या चित्रपटात दाखवला जाईल. हा चित्रपट बनवताना मला विशेष आणि सन्माननीय वाटत आहे.’

रणदीप हुड्डाचा दुसरा बायोपिक

रणदीप हुड्डाने या चित्रपटामधील भूमिकेबद्दल एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, 'असे अनेक क्रांतिकारी आहेत, ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विनायक दामोदर सावरकर यांचे नावही त्यात अग्रक्रमी आहे. त्यांच्याविषयी बऱ्याच चर्चा होत असतात. त्यांच्याबद्दल लोकांना काही गैरसमज आहेत. त्यामुळे त्यांची गोष्ट ही प्रेक्षकांच्या समोर मांडणे गरजेचे आहे.' बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा याचा हा दुसरा बायोपिक असणार आहे. याआधी त्याने ‘सरबजीत’ या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. रणदीप हुड्डा आणि चित्रपट निर्माते संदीप सिंह यांनी यापूर्वी 'सरबजीत' चित्रपटात एकत्र काम केले आहे.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्र आणि लंडनमध्ये होणार आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाची संकल्पना संदीप सिंह यांची असून, उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हुड्डा यांनी लिहिलेल्या या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स, लिजेंड स्टुडिओ, निर्माते आनंद पंडित, संदीप सिंह आणि सॅम खान यांनी केली आहे. तर, चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून रूपा पंडित आणि जफर मेहदी यांनी बाजू सांभाळली आहे.

संबंधित बातम्या

Swatantra Veer Savarkar : रणदीप हुडाचा ‘वीर सावरकर’ चित्रपटातील पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला!

Happy Birthday Randeep Hooda : कधी गाडी धुतली, तर कधी वेटरही झाला! वाचा अभिनेता रणदीप हुडाचा फिल्मी प्रवास..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRamdas Kadam On BJP : भाजपने माझ्याविरोधात काम केलं तर परिणाम राज्यात दिसतील -कदमZero Hour Guest Center Uday Samant :सेनेचा बुरुज BJPच्या झेंड्याखाली,किरण सामंतांची मनधरणी कशी केली?Zero Hour ABP Majha : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांवर भाजपचा झेंडा? महायुतीत काय घडतंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
माहीभाईचा जलवा कायम, धोनीची झलक पाहायला चाहत्यांची झुंबड, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
चेन्नई, मुंबई ते लखनौ महेंद्रसिंह धोनीचा जलवा कायम, एकाना स्टेडियमवर चाहत्यांचा जनसागर, व्हिडीओ व्हायरल
Embed widget