Ranbir Kapoor : रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) 14 एप्रिल 2022 रोजी आलिया भट्टसोबत (Aalia Bhatt) लग्न केले. आलिशान भव्य लग्नाऐवजी या जोडप्याने कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत घरातच लग्नगाठ बांधली. त्यावेळी रणबीरने आलियाच्या बहिणी आणि मेहुण्यांना बुट पळवण्यासाठी 11-12 कोटी रुपये दिल्याचं म्हटलं जातं होतं. नुकतच एका कार्यक्रमात रणबीरला याबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्याने याचा खुलासा केला आहे. त्याचप्रमाणे रणबीरने मेहुणींनी लग्नात किती पैसे दिले हे देखील त्याने सांगितलं. 


कपिल शर्माचा शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' 30 मार्चपासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर एका नवीन फॉर्ममध्ये सुरु झाला. या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये रणबीर कपूर आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा साहनीसोबत उपस्थित होता. तिघांनीही शोमध्ये अनेक मजेशीर किस्से शेअर केले . तसेच  गुत्थीची भूमिका करणाऱ्या सुनील ग्रोवरपासून कपिलच्या टीममधील इतर कलाकारांपर्यंत सर्वांचे खूप मनोरंजन झाले. दरम्यान, कपिल शर्माने रणबीरला विचारले की, लग्नात बुट चोरल्यानंतर मेहुणींना  11-12 कोटी रुपये दिले होते का? 


रणबीरने केला खुलासा


यावर बोलताना रणबीर म्हणाला की, आलियाच्या बहिणींनी कधीच करोडो रुपये मागितले नव्हते. त्यावेळी त्यांनी माझ्याकडे काही लाख रुपये मागितले. पण मी त्यांच्याशी बार्गनिंग करुन त्यांना काही हजारांवर आणलं. त्यानंतर काही हजार रुपये मी त्यांना दिले. आमचं लग्न घरीच झालं, त्यामुळे त्यांनी बुट दिले जरी नसता तरी तो घरीच राहिला असता. 






कपिल शर्मानेही केला खुलासा


दरम्यान यावेळी कपिलनं म्हटलं की, त्याच्या मेहुण्यांनी लग्नात बुट पळवल्यानंतर त्याच्याकडून 11 लाख रुपये मागितले. त्यावेळी त्याने मेहुणींना म्हटलं की, तुमची बहिण आणि ते बुट दोन्ही तुमच्याकडे ठेवा. यावर कार्यक्रमात एकच हशा पिकला. 






ही बातमी वाचा : 


BJP : भाजपचा 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील पात्रांच्या माध्यमातून प्रचार; 'हे अजिबात चुकीचं नाही', निर्माते आसितकुमार मोदींचं स्पष्ट मत