pathaan 2 Big Update :  बॉलीवूडच्या किंग खान अर्थातच शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये पठाण सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक केलं.  हा चित्रपट सर्वांच्या पसंतीस उतरला होता आणि बॉक्स ऑफिसवरही तो हिट ठरला. त्यामुळे या सिनेमानंतर प्रेक्षकांना पठाण 2 (pathaan 2) ची उत्सुकता लागून राहिली होती. पण आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. यशराज फिल्म्स आता लवकरच पठाण 2 वर काम सुरु करण्याचं प्लॅनिंग करत आहे. 


पीपिंग मूनने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख खान वर्षाच्या अखेरीस पठाण 2 चे शूटिंग सुरू करण्याची शक्यता आहे. पठाण या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं होतं. पण या सिनेमाचं सिक्वेलचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार नसल्याची माहिती सध्या समोर आली आहे. त्यामुळे पठाण 2 चे दिग्दर्शन कोण करणार हे अद्याप निश्चित झाले नसल्याचं सांगण्यात येत आहे.  


वर्षाअखेरीस शुटींग सुरु होण्याची शक्यता


आदित्य चोप्रा यशराज स्पाय युनिव्हर्सच्या चित्रपटांमध्ये अगदी सोयीस्कररित्या दिग्दर्शक निवडत असल्याचं पाहायला मिळतं. कोणत्याही चित्रपटाच्या सिक्वेलचं त्याच दिग्दर्शकाने दिग्दर्शन केलं नाहीये. टायगर आणि वॉरच्या सिक्वेलमधून  ही गोष्ट स्पष्ट होते. त्यामुळे पठाण 2 मध्ये ही परंपरा चालू राहिली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या सिक्वेलचं दिग्दर्शन कोण करणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. पण या चित्रपटाचा दिग्दर्शक अजून निश्चित झाला नसला तरीही वर्षाअखेरीस या चित्रपटाचं शुटींग सुरु होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


जानेवारी 2023 मध्ये रिलीज झालेल्या पठाणने शाहरुख खानच्या 2018 च्या झिरो चित्रपटानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. पठाणमध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटाला सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिक कमाई केली. पठाणमधील शाहरुखच्या दमदार कमबॅकमुळे त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का मिळाला होता. त्यानंतर आता त्याचा पठाण 2 पण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे या चित्रपटासंदर्भात बरीच उत्सुकता पाहायला मिळतेय.






ही बातमी वाचा : 


Athiya Shetty Pregnant : सुनील शेट्टी लवकरच आजोबा होणार? अथियाच्या प्रेग्नंसीबाबत स्वत:च दिली मोठी अपडेट, 'पुढच्या वेळेस...'