Ramayana : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir kapoor) आगामी रामायण हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणाने सध्या चांगलाच चर्चेत आहे. कधी स्टार कास्टमुळे तर कधी शुटींगच्या घडामोडीमुळे चित्रपटाची घामासम चर्चा रंगू लागली आहे. नितेश तिवारी लवकरच या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात करणार आहेत. या चित्रपटांच्या कास्टिंगचे काम जोरदार सुरु आहे. रणबीर कपूर या चित्रपटात रामाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर साई पल्लवी सीतामातेची भूमिका साकारणार आहे. अशातच आता निर्माते मधू मंटेनां यांनी निर्माता म्हणून या चित्रपटातून काढता पाय घेतल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी सिनेजगतात मात्र चर्चांनां उधान आले आहे. निर्माते मधू मंटेनां हे नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात.


मधू वर्मा मंटेनां हे सिने जगतातील वलयांकित सिनेनिर्माते आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.यामध्ये गजनी, रक्तचरीत्र, रण, अशा अनेक चित्रपटांचं समावेश होतो. सध्या रामायण चित्रपटांमुळे ते चर्चेत आहेत. पण याआधी ते व्यक्तिगत आयुष्यातील अनेक घटनांमुळे सातत्याने चर्चेत आलेले आहेत. मधू मंटेनां यांनी वयाच्या 48 व्या वर्षी दुसरे लग्न केले होते. 11 जून 2023 रोजी मुंबईतील योगा प्रशिक्षक आणि लेखिका इरा त्रिवेधी यांच्या सोबत लग्न बंधनात ते अडकले होते. त्यावेळी त्यांच्या लग्नाची चांगली चर्चा झाली होती. या लग्न सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


चार वर्षही टिकले नाही पहिले लग्न!


मधू मंटेनां प्रसिद्ध अभिनेत्री निना गुप्ता यांचे जावई होते. त्यांचे पहिले लग्न अभिनेत्री मसाबा गुप्ता सोबत झाले होते. पण त्यांचे लग्न दुर्दैवाने फार काल टिकले नाही. 2015 मध्ये मधू आणि मसाबा लग्न बंधनात अडकले होते. लग्नाच्या चार वर्षांनी म्हणजे 2019 ला ते विभक्त झाले. मात्र मिळाल्या माहिती नुसार मसाबा यांना केवळ लिव्ह इन मध्ये राहण्यात रस होता. त्यामुळे त्यांचे फार काळ वैवाहिक आयुष्य टिकले नाही. नुकतेच मसाबा या देखील विवाहबंधनात अडकल्याची माहिती आहे.


मधू मंटेना यांचे पहिले प्रेम मसाबा नव्हतेच


मधू मंटेना यांनी पहिले लग्न मसाबा गुप्ता सोबत केले होते. परंतू ते त्यांचे पहिले प्रेम नव्हते. मधू मंटेना आणि नंदना सेन 11 वर्ष रिलेशनमध्ये होते. परन्तु त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही.


या चित्रपटांची केली निर्मिती 


मधू मटांनां यांनी गजनी, झुटाही सही, मसान, लुटेरा, हसी तो फसी, कोईन आणि एन एच 10  आदि सिनेमाची निर्मिती केली आहे. तसेच त्यांनी तेलगु आणि बंगाली सिनेमांचीही निर्मिती केली आहे.   


संबंधित बातमी 


Madhu Mantena Ira Trivedi Wedding : वयाच्या 48 व्या वर्षी मधु मंटेना दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर; इरा त्रिवेदीसोबत अडकला लग्नबंधनात