Crew Worldwide Collection Day 2: करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि तब्बू (Tabu) प्रमुख भूमिकेत असलेला 'क्रू' (Crew) हा सध्या बॉक्स ऑफिसवर दंगा घालतोय. हा चित्रपट 29 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. एअर होस्टेसची ही गोष्ट प्रेक्षकांच्या देखील खूप पसंतीस पडत असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे क्रू फक्त  देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर जगभरात चांगला व्यवसाय करत असल्याचं चित्र आहे.  या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 40 कोटींहून अधिकची कमाई केली आहे.


'क्रू' निर्माती एकता कपूरने तिच्या सोशल मीडियावर चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन शेअर केले आहे. त्यानुसार 'क्रू'ने पहिल्या दिवशी जगभरात 20.07 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि दुसऱ्या दिवशी 21.06 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. म्हणजेच जगभरातील बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे दोन दिवसांचे एकूण कलेक्शन 41.13 कोटी रुपये झाले आहे.


राजेश कृष्णन यांचे दिग्दर्शन


दरम्यान देशात बॉक्स ऑफिसवरही 'क्रू'ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. त्यामुळेच चित्रपटाने दोन दिवसांत 18.85 कोटींची कमाई केली. राजेश कृष्णन दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अनिल कपूर, शोभा कपूर, एकता कपूर आणि रिया कपूर यांनी बालाजी टेलिफिल्म्स, AKFC आणि कम्युनिकेशन नेटवर्क प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या बॅनरखाली केली आहे.करीना कपूर, कृती सेनॉन आणि तब्बू या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत, तर कपिल शर्मा, दिलजीत दोसांझ आणि खेसारी लाल यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.


काय आहे सिनेमाची गोष्ट?


 'क्रू' ही एका दिवाळखोर विमान कंपनीत काम करणाऱ्या तीन एअर होस्टेसची गोष्ट आहे. तिघेही आपापल्या आयुष्यातील समस्यांमध्ये अडकले आहेत. विमान कंपनीत काम करूनही पगार मिळत नाही. मग कथेत एक मोठा ट्विस्ट येतो जेव्हा तिघांनाही काहीतरी चुकीचं करायला भाग पाडलं जातं. त्या तिघी हे चुकीचं काम करणार का? त्यांच्या अडचणीत वाढ होणार का हे सगळं सिनेमा पाहिल्यावर स्पष्ट होतं. 






ही बातमी वाचा : 


Tharla Tar Mag : सायली-अर्जुनच्या प्रेमाचा बेरंग करण्याचा प्रयत्न, सुभेदारांची सून प्रियाला तिची जागा दाखवत उधळणार डाव