Madhu Mantena Ira Trivedi Wedding : बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-निर्माता मधु मंटेना (Madhu Mantena) योग प्रशिक्षक इरा त्रिवेदीसोबत (Ira Trivedi) लग्नबंधनात अडकला आहे. मधु आणि इराच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वयाच्या 48 व्या वर्षी मधु मंटेना दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. 


इरा त्रिवेदीने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये इरा आणि मधु रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. इराने फोटो शेअर करत खास कॅप्शन लिहिलं आहे. इरा आणि मधुच्या या फोटोवर सेलिब्रिटींसह चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. खूप खूप अभिनंदन, नव्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा, तुम्हा दोघांसाठी खूप आनंदी आहे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 






मधु मंटेना दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर


मधु मंटेनाने फॅशन डिझायनर मसाबा गुप्तासोबत (Masaba Gupta) 2015 साली लग्न केलं होतं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नानंतर चार वर्षांनी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मसाबा जानेवारी 2023 मध्ये 'बॉम्बे वेलवेट' फेम सत्यदीप मिश्रासोबत लग्नबंधनात अडकली. सत्यदीप आणि मसाबा दोघांचही हे दुसरं लग्न होतं. आदिती राव हैदरीसोबत सत्यदीपने आधी लग्न केलं होतं. 


मधु-इराच्या लग्नसोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी


मधु-इराच्या लग्नसोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात सोनाली बेंद्रे, गोल्डी बहल, ऋतिक रोशन, सबा आजाद, हुमा कुरैशी, जहीर इकबाल, सोनाक्षी सिन्हा, राजकुमार राव, पत्रलेखा, अनुपम खेर, अनिल कपूर, राकेश रोशन, अल्लू अर्जुन, अलाया एफ, आशुतोष गोवारिकर, राहुल बोस, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, मधुर भंडारकर, कार्तिक आर्यन, रकुल प्रीत सिंह, जिनिलिया देशमुख या सेलिब्रिटींचा समावेश होता. 


मधु मंटेनाने 'क्वीन','गजनी', 'एनएच 10', 'मसान' आणि 'लुटेरा'सारख्या सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली आहे. तर दुसरीकडे इरा ही योग प्रशिक्षक असण्यासोबत लेखिकादेखील आहे. 'योग लव' या संस्थेची ती संस्थापिका आहे. योगासंबंधित अनेक व्हिडीओ इरा युट्यूबवर शेअर करत असते. इराचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.


संबंधित बातम्या


Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या...