Shah Rukh Khan : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान(Shah Rukh Khan) नेहमीच कोणत्या ना कारणाने चर्चेत असतो. हिंदी सिनेश्रुष्टीत सुपरहिट ठरल्यानंतर प्रत्येक कलाकाराला हॉलीवूडमध्ये झळकायचे असते. पण किंग खान मात्र बॉलीवूड मध्येच राहिलाय.रोमटींक अंदाजाने त्याने लोखो चाहत्यांच्या मनावर आजही गारुड करून आहे. जगभरात शाहरुख खानची चांगलीच क्रेज आहे. शाहरुख खानची पहिली कमाई 50 रुपये होती. आज मेहनतीच्या जोरावर त्याची एकूण संपत्ती 6300 कोटींच्या आसपास आहे.थियेटरमध्ये तिकीटविक्रीपासून ते बॉक्सऑफिसवरचा बादशहा म्हणून त्याने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे.
आई पासून राहायचं होतं दूर...
शाहरुख खानने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत एक किस्सा शेअर केला होता. शाहरुखची आई रुग्णालयात ICU मध्ये असतांना एका व्यक्तीने त्याला आईसाठी अल्लाकडे दुवा मागण्यासाठी सांगितले होते. त्याने ही बाब मनावर घेऊन तो दुवा मागू लागला. दुव्यामुळे आईची तब्येत सुधारेल या आशेवर शाहरुख दुवा मागत राहिला. परंतू त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी त्याला आई जवळ थांबण्याची विनंती केली होती.अखेर नातेवाईकांच्या विनंतीळा मान देत तो आई जवळ गेला.
हॉलीवूड पासून दूर असणारा किंग खान!( Shah Rukh Khan on Hollywood)
बॉलीवूडच्या प्रतिथयश कलाकारांनी हॉलीवूडमध्ये पदार्पण केले.आणि अल्पावधीतच त्यांना उत्तम यशही मिळाले. देसीगर्ल प्रियंका चोप्रा ते आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट पर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे. स्लमडॉग मिलीनियरने king खानला हॉलीवूडची संधी दिली होती. अनिल कपूर ऐवजी शाहरुख खान निर्मात्यांची पहिली पसंती होती. पण शाहरुख खानने या भूमिकेसाठी स्पष्ट नकार कळवला. एका मुलाखतीत शाहरुख खान याबद्दल म्हणाला होता,"जॉन ट्रैवोल्टासारखा मी डान्स करू शकत नाही किंवा टॉम क्रूज सारखा सुंदर दिसत नाही. त्यामुळे हॉलीवूड मध्ये जाण्याची माझी इच्छाच झाली नाही.
शाहरुख खानची पहिली कमाई किती ? ( Shah Rukh Khan first saliry)
शाहरुखचा समावेश आज जगातील श्रीमंत अभिनेत्यांमध्ये केला जातो. शाहरुखची एकूण संपत्ती 6300 कोटींच्या आसपास आहे. पण त्याची पहिली कमाई ही फक्त 50 रुपये होती. करीयरच्या सुरुवातीला हा अभिनेता तिकीट विक्रीचा काम करायचा. या कामाचा मोबदला त्याला फक्त 50 रुपये मिळत असे, पुढे मेहनतीच्या जोरावर त्याने स्वत:ला सिद्ध केले.अनेक सुपरहिट सिनेमे देऊन सिने जगतात त्याने स्वत:चा अमिट ठसा उमटवला आहे.
संबधित बातम्या