Bollywood Movies Box Office : वर्षभरात अनेक बिग बगेट सिनेमे (Movies) प्रदर्शित झाले असून या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता वर्षाचा शेवटही धमाकेदार होणार आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) आणि विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) हे सिनेमे आज सिनेमागृहात प्रदर्शित होत आहेत. 


रणबीर अन् विकी आमने-सामने


रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' आणि विकी कौशलच्या 'सॅम बहादुर' या सिनेमांची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. आज हे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. रणबीर आणि विकी आमने-सामने आल्याने या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 'अॅनिमल' आणि 'सॅम बहादुर' हे दोन्ही वेगळ्या जॉनरचे सिनेमे आहेत. त्यामुळे दोन्ही सिनेमांचा प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. 


'Animal' की 'Sam Bahadur' अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी? 


रणबीरचा 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. आता 'अॅनिमल' या सिनेमाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी तो सज्ज आहे. 'अॅनिमल'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 19.7 कोटींची (Animal Advance Booking) कमाई केली आहे. तर विकी कौशलच्या 'सॅम बहादुर' (Sam Bahadur Advance Booking) या सिनेमाचे रिलीजआधी 57 हजार तिकीट विकले गेले असून या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगध्ये 1.82 कोटींची कमाई केली आहे. 'अॅडव्हान्स बुकिंगमध्ये रणबीरने बाजी मारली आहे.


रणबीरच्या 'अॅनिमल'बद्दल जाणून घ्या.. (Animal Movie Details)


'अॅनिमल' या सिनेमात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. तसेच रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल हेकलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. संदीप रेड्डी वांगा यांनी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 


विकीच्या 'सॅम बहादुर'बद्दल जाणून घ्या.. (Sam Bahadur Movie Details)


विकी कौशलच्या 'सॅम बहादुर' या सिनेमाची सिनेप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. मेघना गुलजार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. विकीसह या सिनेमात सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख, नीरज काबी मुख्य भूमिकेत आहेत. 'सॅम बहादुर' हा सिनेमा भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 


संबंधित बातम्या


Sam Bahadur Review : कसा आहे सॅम बहादुर? वाचा रिव्ह्यु