Animal : एक्स्प्रेशन क्वीन रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आणि रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाच्या शूटिंगला मनालीत सुरुवात झाली आहे. शूटिंग दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


'अॅनिमल' हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. रश्मिका मंदाना आधी परिणीती चोप्राला या सिनेमासाठी विचारण्यात आले होते. 'अॅनिमल' या सिनेमाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा करत आहेत. भूषण कुमार आणि कृष्णा कुमार यांची 'टी-सीरिज', प्रणय रेड्डी वंगाचे 'भद्रकाली पिक्चर्स' आणि मुराद खेतानी यांचा 'सिने 1 स्टुडिओ' 'अॅनिमल' या गुन्हेगारी  सिनेमाची निर्मिती करणार आहे.





रणबीर कपूर नुकताच आलिया भट्टसोबत लग्नबंधनात अडकला आहे. रणबीर-आलियाचा ब्रम्हास्त्र सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणबीरचा शमशेरा सिनेमादेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. रणबीर-रश्मिकाचे चाहते आता अॅनिमल सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.


संबंधित बातम्या


Kshitij Date : ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमात एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा साकारणार क्षितिज दाते


Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date : आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची रिलीज डेट जाहीर