Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. करण जोहरने एक पोस्ट शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 


करण जोहरने सोशल मीडियावर आलिया-रणवीरसोबतचा एक फोटो आणि खास पोस्ट शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहेत.





आलिया आणि रणवीरशिवाय या सिनेमात धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे दिग्गज कलाकारदेखील दिसणार आहेत. सिनेमाची  रिलीज डेट जाहीर झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आलिया भट्ट नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. लवकरच तिचा ब्रम्हास्त्र सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


संबंधित बातम्या


300 Crore Club Movies: ‘केजीएफ 2’ लवकरच 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार! ‘या’ चित्रपटांनीही केलाय हा विक्रम


Alia Bhatt, Ranbir Kapoor : 'अभिनय करण्यापासून रोखणाऱ्या मुलासोबत लग्न करशील का?', रणबीरचा सवाल; आलियाच्या उत्तरानं वेधलं लक्ष


Nawazuddin Siddiqui : आरआरआर आणि KGF 2 च्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीची रिअॅक्शन; म्हणाला, 'यामध्ये चित्रपट कुठंय?'