KGF 2 : ‘केजीएफ’ चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर चाहते आणि प्रेक्षक त्याच्या पुढील भागाची म्हणजे ‘केजीएफ 2’ची (KGF 2) वाट पाहत होत. अखेर 14 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यशचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल 750 कोटींहून अधिकच गल्ला जमवला आहे. तर, हिंदीमध्येही या चित्रपटाने 298 कोटींचा व्यवसाय केला आहे.


लवकरच ‘केजीएफ 2’ हा चित्रपट 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे कलेक्शन जाहीर केले आहे. अवघ्या दहा दिवसांत या चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. ‘केजीएफ 2’ हा कोरोना महामारीनंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'केजीएफ 2' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील (Prashanth Neel) यांनी केले आहे. 2018मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. यश व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त (Sanjay Dutt), रवीना टंडन (Raveena Tandon) आणि श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty) देखील मुख्य भूमिकेत दिसले आहेत.


किती कलेक्शन झाले?


या चित्रपटाने पहिल्या दिवशी 53.95 कोटी, दुसऱ्या दिवशी 46.79 कोटी, तिसऱ्या दिवशी 42.90 कोटी, चौथ्या दिवशी 50.35 कोटी, पाचव्या दिवशी 25.57 कोटी, सहाव्या दिवशी 19.14 कोटी, सातव्या दिवशी 16.35 कोटी आणि आठव्या दिवशी 13.58 कोटी, नवव्या दिवशी 11.56 कोटी आणि दहाव्या दिवशी 19.25 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे एकूण कलेक्शन 298.44 कोटी झाले आहे. वर्ल्ड वाईड कलेक्शनमध्ये या चित्रपटाने अवघ्या दहा दिवसांत 800 कोटींचा टप्पा गाठला आहे.



‘या’ चित्रपटांचाही 300 कोटींच्या क्लबमध्ये समावेश!


300 कोटींच्या क्लबमध्ये आतापर्यंत ‘पीके’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’, ‘दंगल’, ‘टायगर जिंदा है’, ‘पद्मावत’, ‘संजू’, ‘वॉर’ या बॉलिवूड चित्रपटांचा समावेश आहे. आता लवकरच ‘केजीएफ 2’ देखील यात सामील होणार आहे.   



हेही वाचा :