Kshitij Date : लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer mukkam post thane) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. तर एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा क्षितिज दातेने साकारली आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांना गुरुच नव्हे तर देव मानणारे आणि सावलीसारखे त्यांच्यासोबत असणारे एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा अभिनेता क्षितिज दाते साकारणार आहे. प्रसाद ओक यांच्याप्रमाणेच क्षितिज दातेचाही लूक एकदम हुबेहुब जुळून आला आहे. ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी या चित्रपटातील हे सर्व लूक डिझाईन केले आहेत.
'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आता सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. आपल्या लोकनेत्याला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने सजलेला, झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला
‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा चित्रपट येत्या 13 मे रोजी झी स्टुडिओजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. प्रेक्षक आता या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.