Alia Ranbir Wedding : आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आलिया आणि रणबीरच्या प्री वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली असून 14 एप्रिलला दोघे सात फेरे घेणार आहेत. रणबीरची आई नीतू कपूर यांनी आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या तारखेसंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे. आरके हाऊसमध्ये उद्या आलिया आणि रणबीर लग्नबंधनात अडकणार आहेत. 


रणबीर कपूरची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर यांनी मेहेंदीसोहळ्यानंतर एका मुलाखतीत म्हटले आहे, आलिया आणि रणबीरचे उद्या म्हणजेच 14 एप्रिलला लग्न होणार आहे. या लग्नासाठी प्रत्येकजण उत्साही आहे. करिश्मा कपूर, करीना कपूर, करण जोहरसह अनेक सेलिब्रिटींनी रणबीर-आलियाच्या प्री वेडिंग फंक्शन्सला हजेरी लावली होती.





आलिया आणि रणबीरने त्यांच्या आगामी अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. 'ब्रह्मास्त्र' सिनेमा 9 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषेंत प्रदर्शित होणार आहे. आलिया आणि रणबीर लग्नानंतर लगेचच आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. आलिया भट्ट तिच्या लग्नात सब्यसाची मुखर्जीचा पोशाख परिधान करणार आहे. आलिया-रणबीरच्या घराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. कपूर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर असलेल्या आरके हाऊसमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा पार पडणार आहे. आलिया-रणबीर पंजाबी रितीरिवाजानुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. तर हनिमूनला स्वित्झर्लंडला जाणार आहेत. 


संबंधित बातम्या


Alia Ranbir Wedding : लग्नानंतर लगेचच आलिया-रणबीर करणार 'या' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात


Alia-Ranbir Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस


Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त अखेर ठरला, रणधीर कपूर यांनी सोडलं मौन