Alia-Ranbir Wedding : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नासंदर्भात चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता दिसत आहे. रणबीर-आलियाच्या प्री-वेडिंग फंक्शनला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावत असले तरी या सोहळ्यातील प्रत्येत अपडेट गुप्त ठेवण्यात येत आहे. दरम्यान सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मीम्स बनवायला सुरुवात केली आहे.
आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होऊ नये यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. कपूर आणि भट्ट कुटुंबातील सदस्य तसेच अनेक सेलिब्रिटी आरके हाऊसमध्ये हजेरी लावत आहेत. परंतु अद्याप कोणीही अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळेच नेटकरी सोशल मीडियावर मीम्स बनवताना दिसत आहेत. 'नायक' सिनेमातील सौरभ शुक्लाच्या एका विनोदी सीनवरून एका नेटकऱ्याने एक मजेशीर मीम शेअर केले आहे.
आलियाचा लग्नसोहळ्यातील पेहराव मनीष मल्होत्रा आणि सब्यसाचीचा असल्याने त्यांच्यावरदेखील खास मीम बनवण्यात आले आहेत. हे मीम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर आलिया भट्ट आणि रणवीर सिंह ट्रेडिंगमध्ये आहेत.
आज आरके हाऊसमध्ये आलिया-रणबीरचा मेहेंदी सोहळा पार पडणार आहे. थोड्याच वेळात आलियाच्या हातावर रणबीरच्या नावाची मेहेंदी लागणार आहे. आलिया-रणबीरच्या मेहेंदी सोहळ्यात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत.
संबंधित बातम्या