Alia Ranbir Wedding : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या लग्नामुळे चर्चेत आहे. आलिया आणि रणबीरच्या प्री वेडिंग फंक्शन्सला आजपासून सुरुवात झाली आहे. रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीर लग्नानंतर लगेचच आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. 


रणबीर कपूर लग्नानंतर लगेचच मनालीमध्ये त्याच्या आगामी 'अॅनिमल' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. दोन दिवस मनालीत या सिनेमाचे शूटिंग होणार आहे. त्यानंतर लगेचच मुंबईत या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. आलियादेखील तिच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमातील गाण्याच्या शूटिंगसाठी स्वित्झर्लंडला जाणार आहे.





अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या सेटवर रणबीर आणि आलियाची जवळीक वाढली आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. आज आरके हाऊसमध्ये आलिया-रणबीरचा मेहेंदी सोहळा पार पडणार आहे. कपूर आणि भट्ट कुटुंबीयांनी लग्नासंदर्भात मौन बाळगले असले तरी त्यांच्या घरी लग्नाची लगबग सुरू झाली आहे. लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. 


संबंधित बातम्या


Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त अखेर ठरला, रणधीर कपूर यांनी सोडलं मौन


Brahmastra Teaser Song : अयान मुखर्जीनं आलिया-रणबीरला दिल्या खास शुभेच्छा; 'ब्रम्हास्त्र' चित्रपटातील गाण्याचा व्हिडीओ केला शेअर


Dharmaveer movie Teaser : 'जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर करायचं नाही'; आनंद दिघे यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर