Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) कधी लग्नबंधनात अडकणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अखेर आलिया आणि रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला आहे. रणबीरचे काका रणधीर कपूर (Randhir kapoor) यांनी लग्नाची तारीख जाहीर केली आहे. आलिया आणि रणबीर 15 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहेत.
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत रणधीर कपूर म्हणाले,"रणबीरचे लग्न आज होणार नाही. 15 एप्रिलला आलिया आणि रणबीर लग्नबंधनात अडकणार आहेत". कपूर आणि भट्ट कुटुंबीयांनी लग्नासंदर्भात मौन बाळगले असले तरी त्यांच्या घरी लग्नाची लगबग सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीरचे प्री वेडिंग फंक्शन्स आजपासून सुरू होणार आहेत.
आलिया लवकरच सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नासंदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे. आज आरके हाऊसमध्ये आलिया-रणबीरचा मेहेंदी सोहळा पार पडणार आहे. थोड्याच वेळात आलियाच्या हातावर रणबीरच्या नावाची मेहेंदी लागणार आहे. आलिया-रणबीरच्या मेहेंदी सोहळ्यात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. मेहंदी फंक्शन्ससोबतच जवळच्या मित्रांसाठी कॉकटेल पार्टीचेही आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. कृष्णा राज बंगल्यात ही पार्टी होणार असल्याचं समोर येत आहे.
रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीरने त्यांच्या आगामी अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. 'ब्रह्मास्त्र' सिनेमा 9 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषेंत प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या