Ranbir Kapoor on Ramayana : नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित 'रामायण' (Ramayana) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. चाहत्यांमध्ये या सिनेमाची कमालीची उत्सुकता आहे. बॉलिवूडचा 'चॉकलेट बॉय' रणबीर कपूरला प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तर दुसरीकडे रणबीरदेखील या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. 'रामायण' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावा यासाठी रणबीर खूप मेहनत घेत आहे. काही गोष्टींचा त्याग करण्यासोबत त्याने खास ट्रेनिंगदेखील सुरू केलं आहे. आता चाहत्यांना फक्त सिनेमाची प्रतीक्षा आहे.


'रामायण'साठी रणबीर घेतोय मेहनत (Ranbir Kapoor Training)


'रामायण' सिनेमासाठी रणबीर कपूरने खास ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आहे. रणबीरचा एक फोटो (Ranbir Kapoor Viral Photo) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो इंटेस मोडमध्ये दिसून येत आहे. हेडस्टँड करताना तो दिसून येत आहे. डोक्यावर उभं राहणं हा व्यायामप्रकार रणबीरने पहिल्यांदाच केला आहे. रणबीरच्या ट्रेनरने त्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणबीर ब्लॅक शॉट्स आणि फुल स्लीव्हस टी-शर्टमध्ये दिसत आहे. वर्कआऊट करतानाचा रणबीरचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.




रणबीरने सोडलं नॉन-व्हेज (Ranbir Kapoor Stop Drinking Alcohol And Eating Meat)


इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, नितेश तिवारीची एक टीम फक्त डिक्शन आणि डायलॉगवर काम करणार आहे. तसेच या सिनेमातील कलाकारांच्या कॉस्ट्यूमवरदेखील काम सुरू आहे. रणबीर कपूर या सिनेमावर खूपच मेहनत घेताना दिसून येत आहे. प्रत्येक डायलॉगवर तो रिसर्च करत आहे. 'रामायण' या सिनेमावर काम सुरू केल्यापासून प्रभू श्रीरामाची भूमिका साकारताना रणबीरने दारू आणि नॉन व्हेजचा त्याग केला आहे. रणबीरला रामाप्रमाणे पवित्र व्हायचं आहे. तसेच रात्रीच्या पार्टी करणंदेखील त्याने बंद केलं आहे.


'रामायण'च्या शूटिंगला होणार सुरुवात (Ramayana Movie Shooting Starcast)


बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, 'रामायण' सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. काही कारणाने सध्या या सिनेमाचं काम थांबवण्यात आलं आहे. पण लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. 'रामायण' सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीरामच्या भूमिकेत असून साई पल्लवी (Sai Pallavi) सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच यश (Yash) रावणाच्या आणि सनी देओल (Sunny Deol) हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) या सिनेमात दशरथच्या भूमिकेत दिसणार आहे.


संबंधित बातम्या


Ramayana : नितेश तिवारीच्या 'रामायण'बाबत फक्त 'ही' बातमी खरी; बाकी सर्व अफवा