Ramayana : नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित 'रामायण' (Ramayana) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनचं काम सुरू आहे. या बहचर्चित सिनेमात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) सीता मातेची भूमिका वठवणार आहे. 'रामायण'ची घोषणा झाल्यापासून या सिनेमासंदर्भात विविध अपडेट्स समोर येत आहेत. प्रेक्षकदेखील सिनेमासंदर्भातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यास उत्सुक आहेत. बहुप्रतिक्षित सिनेमाबाबत अनेक अफवाही पसरल्या जात आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना आता फक्त सिनेमाची प्रतीक्षा आहे.
'रामायण' सिनेमाबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. सिनेमाची स्टारकास्ट, शूटिंग शेड्युल आणि पहिला भाग संपल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण निर्मात्यांनी अद्याप या सिनेमासंदर्भात काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही. अशातच आता 'रामायण' सिनेमासंदर्भात आतापर्यंत समोर आलेली सर्व माहिती अफवा असल्याचं समोर आलं आहे. 'रामायण' सिनेमात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) झळकणार असल्याचं वृत्त सोडलं तर बाकी सर्व अफवा आहेत.
राम नवमीच्या मुहूर्तावर निर्माते करणार घोषणा
टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, 'रामायण' सिनेमाबाबतची आतापर्यंत रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या कास्टिंगची बातमी खरी आहे. 'रामायण'मध्ये यश, लारा दत्ता, हरमन बावेजा आणि सनी देओल झळकणार असल्याची बातमी समोर आली होती. पण आता ही स्टारकास्टची बातमी फेक न्यूज असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, निर्माते 17 एप्रिल 2024 रोजी राम नवमीच्या मुहूर्तावर या सिनेमासंदर्भात अधिकृत माहिती देतील.
'रामायण'मधील कॉस्ट्यूमवरुन या सिनेमाचं चित्रीकरण लांबणीवर गेल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. पण आता टाइम्सच्या रिपोर्टनुसार, काही वादग्रस्त कारणांनी या सिनेमाचं शूटिंग लांबणीवर गेल्याचं समोर आलं आहे. लवकरच निर्माते चाहत्यांना यासंदर्भात माहिती देतील, अशी आशा आहे.
'रामायण'च्या कास्टिंगवर प्रश्नचिन्ह
आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्टनुसार, 'रामायण'मध्ये यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं होतं. तर विभिषणच्या भूमिकेत हरमन बावेजा दिसून येणार होता. हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल आणि रानी कैकेयीच्या भूमिकेसाठी लारा दत्ताला कास्ट केल्याचं समोर आलं होतं. पण आता यासर्वांच्या कास्टिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. फक्त रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या कास्टिंगची बातमी खरी असल्याचं म्हटलं जात आहे.
'रामायण' कधी रिलीज होणार? (Ramayana Release Date)
'रामायण' हा सिनेमा 'दिवाळी 2025' मध्ये सिनेमागृहात रिलीज होऊ शकतो. या सिनेमात वीएफएक्स तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. निर्माते राम नवमीच्या मुहूर्तावर या सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा करू शकतात. 'रामायण' या भव्यदिव्य सिनेमाची देशभरातील सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या