Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या सिनेमामुळे चर्चेत असतो. पण आता तो कोणत्याही सिनेमामुळे चर्चेत नसून 'आयपीएल 2024'मुळे (IPL 2024) चर्चेत आहे. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrise Hydrabad) हा सामना पाहायला किंग खान स्टेडियममध्ये गेला होता. या सामन्यादरम्यानचा शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख धूम्रपान करत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. 


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान व्हीआयपी बॉक्समध्ये क्रिकेट सामना पाहताना दिसत आहे. यावेळी किंग खानसोबत आणखी काही लोकदेखील दिसत आहेत. दरम्यान किंग खान सिगारेट ओढत असल्याचं पाहायला मिळत आहे. शाहरुखला धूम्रपान करताना पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एकीकडे नेटकरी त्याला ट्रोल करत असताना दुसरीकडे चाहते मात्र त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. 






शाहरुखवर कारवाई होणार?


क्रिकेट स्टेडियमवर शाहरुख खान विविध कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकतो. याआधी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये त्याच्यावर बंदी होती. ग्राऊंड स्टाफसोबत बाचाबाची केल्याने त्यावर पाच वर्षांसाठी स्टेडियममध्ये येण्यास बंदी घातली होती. अशातच आता ईडन गार्डन्समधील त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धूम्रमान केल्याने बंगाल क्रिकेट असोसिएशनने अॅक्शन घ्यायला हवी, असं नेटकरी म्हणत आहेत. अद्याप किंग खानने यासंदर्भात काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. आता बंगाल क्रिकेट असोसिएशन काय अॅक्शन घेणार हे पाहावे लागेल. शाहरुख खानच्या व्हायरल व्हिडीओआधी पाकिस्तान सुपर लीगमधील लाईव्ह मॅचदरम्यान इमाद वसीम ड्रेसिंग रूममध्ये सिगारेट ओढताना दिसला होता. त्यानंतर मोठा वाद सुरू झाला होता. आता शाहरुखवर कारवाई होणार का हे पाहावे लागेल.  


शाहरुखने गाजवलं 2023 वर्ष!


शाहरुख खानने 2023 या वर्षात बॉक्स ऑफिसवर राज्य केलं आहे. 'पठाण' (Pathaan),'जवान' (Jawan) आणि 'डंकी' (Dunki) हे शाहरुखचे सिनेमे 2023 मध्ये प्रदर्शित झाले. या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. आता किंग खानच्या आगामी सिनेमांकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.


संबंधित बातम्या


IPL 2024: Shahrukh Khan Viral Video: क्लासेनच्या खेळीची चर्चा होत असताना शाहरुख खानचा Video व्हायरल; VIP बॉक्समध्ये त्याने काय केलं?