Rakhi Gulzar Birthday : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलजार (Rakhi Gulzar) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1947 पश्चिम बंगालमधील रानाघाटमध्ये झाला. राखी यांच्या आयुष्यात बरेच चढ-उतार आले. वयाच्या 16 व्या वर्षी राखी यांचे पहिले लग्न अजय विश्वास यांच्यासोबत झाले. अजय विश्वास हे  पत्रकार आणि दिग्दर्शक होते. लग्नानंतर दोन वर्षांनी अजय आणि राखी यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राखी यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. जाणून घेऊयात राखी यांच्याबद्दल...


बंगाली चित्रपटातून केलं पदार्पण


1967 मध्ये रिलीज झालेल्या बोधु बोरॉन या बंगाली चित्रपटामधून राखी यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तीन वर्षांनंतर राखी यांना राजश्री प्रॉडक्शनचा जीवन मृत्यु हा चित्रपट मिळाला ज्यात धर्मेंद्र यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. चित्रपटांमध्ये काम करत असताना राखी यांची भेट प्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्यासोबत झाली. 1973 मध्ये राखी आणि गुलजार यांनी लग्नगाठ बांधली. पण  राखी आणि गुलजार यांना एक मुलगी झाली. तिच नाव त्यांनी मेघना असं ठेवलं. मुलीच्या जन्मानंतर गुलजार आणि राखी यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला. दोघांनी घटस्फोट घेतला नाही. पण आजही हे दोघे वेगळं राहतात. 


करण अर्जुन चित्रपटातील डायलॉगमुळे लोकप्रिय


राखी यांना लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम करायचं होतं पण याचा गुलजार हे विरोध करत होते. लग्नानंतर राखी यांनी मेरे सजना, अंगारे, कभी कभी, दूसरा आदमी, कसमें वादे, काला पत्थर, श्रीमान श्रीमती यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या करण अर्जुन या चित्रपटातील 'मेरे करण अर्जुन आयेंगे' या डायलॉगमुळे राखी यांना विशेष लोकप्रियता मिळाली. सध्या राखी या मुंबईजवळ पनवेल येथील त्यांच्या फार्महाऊसवर एकट्याच राहतात. सार्वजनिक ठिकाणीही त्या जात नाहीत. पण राखी यांच्या अभिनयला आजही प्रेक्षकांची पसंती मिळते. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: