Raju Srivastava Health Update: कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या प्रकृतीविषयी नवी अपडेट समोर येत आहे. नव्या अपडेटनुसार, राजू यांचा एमआरआय रिपोर्ट समोर आला आहे, ज्यानुसार त्यांच्या मेंदूतील नस दबल्याची माहिती समोर आली आहे (Raju Srivastava Health Update). राजू श्रीवास्तव यांना बुधवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. यावेळी डॉक्टर देखील राजू यांना लवकर बरे वाटावे म्हणून शर्थीचे प्रयतन करत आहेत. तर, कुटुंबीयांपासून त्यांच्या चाहत्यांपर्यंत सगळेच त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.
हृदयविकाराचा झटका आल्यामुळे राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अनेक बातम्या, अफवा येत आहेत. मात्र, आता राजू यांचा भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी त्यांच्या एमआरआय रिपोर्टबद्दल माहिती दिली आहे. दीपू यांनी सांगितले की, राजूच्या मेंदूतील काही नसा दबल्या आहेत. त्या ठीक करण्यासाठी डॉक्टर त्यांचे पूर्ण प्रयत्न करत आहेत.
कुटुंबाने चाहत्यांना केले आवाहन
राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनीही एक निवेदन शेअर केले आणि लोकांना त्याच्या मृत्यूच्या अफवा पसरवू नका, असे आवाहन केले आहे. राजू यांच्या कुटुंबाने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'राजू श्रीवास्तवजींची प्रकृती स्थिर आहे. आम्ही ते लवकरात लवकर बरे व्हावेत, म्हणून प्रार्थना करत आहोत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत आणि सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.’
तब्येतीत काहीशी सुधारणा!
10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजू श्रीवास्तव यांना दाखल केल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, मात्र अलीकडेच राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याचे माहिती समोर आली आहे. राजू आता उपचारांना प्रतिसाद देत असून, त्यांना नळीद्वारे लिक्विड देण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी मात्र, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कॉमेडियनला शुद्धीवर येण्यासाठी काही दिवस लागू शकतात.
राजू श्रीवास्तव यांची कारकीर्द
राजू श्रीवास्तव 1980च्या दशकाच्या उत्तरार्धापासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या पहिल्या सीझनमध्ये सहभागी झाल्यानंतर ते देशभरात लोकप्रिय झाले. 'मैने प्यार किया', 'बाजीगर', 'बॉम्बे टू गोवा' आणि 'आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपैया' या चित्रपटातही त्यांनी काम केले. राजू श्रीवास्तव 'बिग बॉस सीझन 3’मध्येही सहभागी झाले होते. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला आणि विनोदांना प्रेक्षकांची पसंती मिळते. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील राजू अॅक्टिव्ह असतात.
वाचा इतर बातम्या :