Rajkummar Rao आणि Patralekhaa हनीमूनला जाणार नाहीत... कारण ऐकूण थक्क व्हाल....
राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekhaa) लग्नानंतर हनीमूनला जाऊ शकत नाही आहेत.
Rajkummar Rao - Patralekhaa Wedding : राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekhaa) मागील एका आठवड्यात चर्चेचा विषय बनले आहेत. राजकुमार पत्रलेखासोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामुळे चाहत्यांना राजकुमार आणि पत्रलेखा हनीमूनला कुठे जाणार असा प्रश्न पडला आहे. पण राजकुमार आणि पत्रलेखा लग्नानंतर आता हनीमूनला जाणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
अनुभव सिन्हा दिग्दर्शन करत असलेल्या 'भीड' सिनेमाची शूटिंग लखनौमध्ये होणार आहे. या शूटिंगसाठी राजकुमार राव लखनऊला रवाना होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सिनेमासाठी अनुभव सिन्हा खूप उत्साहित आहे. या सिनेमाचे शूटिंग नोव्हेंबर - डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. अनुभव सिन्हाने राजकुमारला सिनेमाच्या शूटिंगसाठी विचारले असता राजकुमार त्याला नाही म्हणू शकला नाही.
'भीड' सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतर राजकुमार आणि पत्रलेखा हनीमूनला जातील, अशी शक्यता आहे. 'भीड' सिनेमात राजकुमार रावसोबत भूमी पेडणेकर दिसून येणार आहे. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरची जोडी याआधी 'बधाई दो' सिनेमात दिसून आली होती. हा एक विनोदी सिनेमा असणार आहे.
View this post on Instagram
लग्नसोहळ्यात लक्षवेधी ठरली पत्रलेखाची ओढणी
राजकुमारने सोशल मीडियावर पत्रलेखासोबतचा रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. पत्रलेखाच्या ओढणीच्या बॉर्डरवर एक खास संदेश लिहिला आहे. हा संदेश बंगाली भाषेत लिहिलेला आहे. या संदेशात लिहिले आहे, "माझं प्रेमाने भरलेलं हृदय आता तुला समर्पित करत आहे".
संबंधित बातम्या
Netflix Website : Netflix प्रेमींसाठी खुशखबर! लोकप्रिय सिनेमे आणि वेब सीरिजसाठी नवी वेबसाइट लॉन्च
महाराष्ट्र सरकारने सलमानला दिली विशेष जबाबदारी
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर, नाना पाटेकर, संजय राऊतांसह 'या' दिग्गजांचा गौरव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha