![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rajkummar Rao Wedding Card : शादी में जरूर आना... राजकुमार आणि पत्रलेखाची लग्नपत्रिका व्हायरल, चंदीगडमध्ये बांधणार लग्नगाठ
आज (15 नोव्हेंबर) राजकुमार आणि अभिनेत्री पत्रलेखा (Patralekhaa)चंदीगड येथे लग्नगाठ बांधणार आहेत.
![Rajkummar Rao Wedding Card : शादी में जरूर आना... राजकुमार आणि पत्रलेखाची लग्नपत्रिका व्हायरल, चंदीगडमध्ये बांधणार लग्नगाठ rajkummar rao and patralekhaa lavish wedding invitaion goes viral Rajkummar Rao Wedding Card : शादी में जरूर आना... राजकुमार आणि पत्रलेखाची लग्नपत्रिका व्हायरल, चंदीगडमध्ये बांधणार लग्नगाठ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/79df3f65e57c682a88562314d2746d51_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rajkummar Rao-Patralekhaa Wedding Invitaion Card: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करत असतो. सध्या तो त्याच्या लग्नसोहळ्यामुळे चर्चेत आहे. आज (15 नोव्हेंबर) राजकुमार आणि अभिनेत्री पत्रलेखा (Patralekhaa)चंदीगड येथे लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या या शाहीविवाह सोहळ्याची आमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पत्रलेखा आणि राजकुमार यांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रिकेवर लग्न चंदीगडमधील ओबेरॉय सुखविलास या हॉटेलमध्ये लग्नसोहळा संपन्न होणार असल्याचे लिहीले आहे. पत्रलेखा आणि राजकुमारच्या लग्नाला फराह खान, हुमा कुरैशी हे सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. पत्रलेखा आणि राजकुमार यांची ओळख सिटी लाइट्स या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान झाली. हे दोघे एकमेकांना 2010 पासून एकमेकांना डेट करत आहेत.
View this post on Instagram
पत्रलेखा आणि राजकुमारच्या लग्नाचे आउटफिट हे सेलिब्रिटी डिझायनर सब्यसाची हे डिझाइन करणार आहेत. या लग्नात दोघांचे नातेवाईक आणि काही जवळचे मित्र सहभागी होतील. राजकुमारच्या हम दो हमारे दो, काय पो छे, न्यूटन, शादी में जरूर आना आणि क्विन या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. बॉलिवूडमध्ये सध्या सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. पत्रलेखा आणि राजकुमारसोबतच विकी कौशल आणि कतरिना कैफ, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)