Rajnikant Medical Bulletin : साऊथचे सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना गुरुवारी चेन्नईतील (Chennai) कावेरी रुग्णालयात (Kauvery hospital) दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना 'रुटिन चेकअप'साठी रुग्णालयात नेले आहे, अशी माहिती समोर येत होती. पण आता त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मेडिकल बुलेटिनद्वारे समोर आली आहे. रुग्णालयात दाखल होण्याच्या चार दिवस आधीच रजनीकांत यांना मानाच्या समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मेडीकल बुलेटिन नुसार, रजनीकांत यांना चक्कर आल्याने त्यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात 28 ऑक्टोबरला दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे 'रुटिन चेकअप' करण्यात आले. त्यानुसार डॉक्टरांनी त्यांना कार्टोइड आर्टरी रिवास्कुलरायजेशन (Cartoid Artery Revascularisation) शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. आज त्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. लवकरच ते रुग्णालयातून बाहेर पडणार आहेत.
Rajinikanth Health Updates: सुपरस्टार रजनीकांत चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात दाखल
Rajinikanth Meets PM Modi : सुपरस्टार रजनीकांतने घेतली राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट
मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर रजनीकांत यांनी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच पार पडला. त्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते रजनीकांत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.