Rajinikanth Meets President And PM Modi : साउथ सुपरस्टार रजनीकांत यांना मानाचा मानला जाणारा  दादासाहेब फाळके पुरस्कार  मिळाला आहे. त्यामुळेच रजनीकांत यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. 


67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच पार पडला आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसने जगात घातलेल्या थैमानामुळे राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा यंदा उशिरा करण्यात आली होती. उपराष्ट्रपती म्हणाले,"भारतीय सिनेसृष्टी वेगवेगळ्या कथानकांचे चित्रपट बनवत आहे. या चित्रपटांमधून मनोरंजनासोबत प्रबोधनदेखील होत असते". 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा वितरण सोहळ्यात मनोज बाजपेयी, धनुष आणि कंगना रनौतसह अनेकांना पुरस्कार देण्यात आले. 


67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा वितरण सोहळ्यात 'मरक्कर-अराबिक्कदालिन्ते-सिम्हम' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुस्कार प्रदान करण्यात आला आहे. सिक्किमला चित्रपटांसाठी अनुकूल राज्य म्हणजेच (मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट) या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. कंगना रनौतला दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कंगनाला 'मणिकर्णिका' आणि 'पंगा' या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे आहे. आनंदी गोपाळ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले. अभिनेता धनुष आणि मनोज बाजपेयी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार प्रादन करण्यात आला असून 'महर्षि' हा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.


Dadasaheb Phalke Award: सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणार; पण, एका गोष्टीचं दुःख : रजनीकांत


रजनीकांत पद्मभूषण आणि पद्मविभूषणने सन्मानित
भारतातील सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक, रजनीकांत यांना भारत सरकारने 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले आहे. रजनीकांत यांनी अपूर्व रागंगल या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याच्या अनेक हिट चित्रपटांपैकी 'बाशा', 'शिवाजी' आणि 'एंथिरन' सारखे चित्रपट आहेत. तो त्याच्या चाहत्यांमध्ये थलाईवर (नेता) म्हणून ओळखला जातो.


67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा सोहळा दिमाखात पार, पाहा पुरस्कार सोहळ्यातील फोटो